मुंबई, 23 नोव्हेंबर 2023: (Maharashtra Weather Update ) भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस असेल. सोबतच, उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पुन्हा अवकाळीशी सामना होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला उद्यापासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश आंशिक ढगाळ आणि हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील ५ दिवसादरम्यान, कमाल तापमान ३१.९ ते ३२.४ अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान १६.६ ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील पुढील पाच दिवस आंशिक ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. या काळात गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पाडणारा पूर्वेकडील कुंड पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहे. लवकरच केरळ आणि लगतच्या भागात पोहोचेल. दरम्यान, मुंबईत 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, २४ नोव्हेंबरलाही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात चांगला पाऊस पडू शकतो, 27 नोव्हेंबर रोजी पावसात घट होईल.
- nagpur rain | नागपुरात अतिवृष्टी; २ ठार, १४ जनावरे दगावली(
- ३०० वर्षांनी यंदा गणेशोत्सव काळात या राशीच्या लोकांना ही ठरणार आनंदाची बातमी
- या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli
- वन नेशन वन इलेक्शन काय आहे नेमकी भानगड | One Nation One Election Update
- १७ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी; परिपत्रक जारी
Discussion about this post