Chief Minister-Deputy Chief Minister to Delhi immediately
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. आताची महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत. अचानकपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे.
पालकमंत्री पद वाटप करण्यात आले नाही. यावर वरिष्ठांसोबत चर्चा होणार आहे, अशी माहिती मिळते. राज्यातली स्थिती जर आपण पाहिली तर आरक्षणाबाबत सदस्य, अनेक समाज जास्त आक्रमक आहेत. यासाठीच हे दोन्ही नेते जे आहे ते दिल्लीला गेल्याची माहिती आहे.
माधुरी, उज्ज्वल निकम यांच्यासह “या” चार नावांची लोकसभेसाठी चर्चा
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे अजित पवार हे नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांची नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामागचे कारण आहे काय, असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
devendra fadanvis | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
Discussion about this post