चंद्रपूर (प्रतिनिधी) । जिल्ह्यातील सावली तालुक्यात शेत पांदन (Shet Panand ) रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. हे रस्ते जवळपास खराब झाले असून, शेतकऱ्यांना आणि मजुरांना शेतात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे पांदन रस्त्यांची स्थिती सुधारण्याची मागणी केली आहे. ( Former Panchayat Samiti Chairman Vijay Korewar)
सावली तालुका हा केवळ शेतीवर अवलंबून असणारा आहे. शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना शेतात जाणे आवश्यक असते. मात्र, खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना आणि मजुरांना शेतात जाण्यासाठी तासन्तासच लागतात. यामुळे शेतीच्या कामांवर विलंब होत आहे. शेतातील शेतमाल आणण्यासाठी, खते बियाणे ने आण करण्यासाठी, बैलबंडी, गुरे, ट्रॅक्टर, शेतकरी, मजूर, व्यापारी यांना शेतापर्यंत जाण्यासाठी मजबूत रस्त्यांची आवश्यकता असते.
ग्रामीण भागातील समस्या मांडणारा पत्रकार : सूरज बोम्मावार
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पांदन रस्त्याचे मातीकाम व मुरूमचे काम झाले होते. मात्र, जडवाहतुकीमुळे हे सर्व रस्ते फार चिखलमय झाले असून वाहने सोडून माणसांनाही पायदळ जाता येत नाही. माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे पांदन रस्त्यांची स्थिती सुधारण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून प्राधान्याने पांदन रस्ते खडीकरण करण्याची आवश्यकता आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि मजुरांना शेतात जाण्यासाठी सुलभता होईल.
- मागणीतील प्रमुख मुद्दे
- सावली तालुका हा केवळ शेतीवर अवलंबून असणारा आहे.
- शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना शेतात जाणे आवश्यक असते.
- खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना आणि मजुरांना शेतात जाण्यासाठी तासन्तासच लागतात.
- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून प्राधान्याने पांदन रस्ते खडीकरण करण्याची आवश्यकता आहे.माजी सभापती कोरेवार यांच्या मागणीचे महत्त्व:
- शेतकऱ्यांना आणि मजुरांना शेतात जाण्यासाठी सुलभता होईल.
- शेतीच्या कामांवर होणारा विलंब कमी होईल.
- शेतीचा विकास होईल.
- बेरोजगार युवकांचेही शेतीकडे कल वाढेल.
The condition of Shet Pandan roads in Savli Taluka of the district is critical. These roads are almost damaged and farmers and laborers are facing great hardship to reach the fields. Former Panchayat Samiti Chairman Vijay Korewar has demanded the Cadre Development Officer to improve the condition of Pandan roads.
Discussion about this post