News34
चंद्रपूर – राज्यात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केल्यावर अनेक पक्षांचे धाबे दणाणले आहे, भारत राष्ट्र समितीला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक नेते सामाजिक कार्यकर्ते प्रवेश घेत आहे. BRS Party
चंद्रपुरातील अनेक बड्या नेत्यांनी BRS मध्ये प्रवेश घेतला असून पुन्हा सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या नागरिकांनी के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
दिनांक 11 जुलै रोजी हैदराबाद येथे चंद्रपुर जिल्ह्याचे भारत राष्ट्र समिती पक्षाचे इन्चार्ज वमसी कुष्णा अरिकिल्ला ह्याचें सोबत चंद्रपूर जिल्ह्यातून विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची BRS पार्टीचे प्रमुख तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ह्यांची त्यांचे निवासस्थानी प्रगती भवन हैद्राबाद येथे भेट घेऊन त्या नंतर झालेल्या चर्चे नंतर भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.
प्रवेश घेणाऱ्या मध्ये चंद्रपूर निवासी इंजिनियर आनंद ठेंगणे, नंदकिशोर येलंटीवार, माजी सरपंच मनोहर डोर्लीकर, सावली येथील सतीश गड्डमवार, तसेच भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील आजी व माजी नगरसेवक तसेच इतर संघटनाचे पदाधिकारी B R S पक्षात सामील झाले.
Discussion about this post