*श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती महोत्सव ६ डिसेंबरपासून*
*८ डिसेंबर रोजी चंद्रपुरात निघणार शोभायात्रा*
चंद्रपूर दि.1:- तैलीक युवा आणि महिला एल्गार संघटना व तेली समाजाच्या विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.६ डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरुवात होणार असून,८ डिसेंबर रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान,तीन दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचतेली समाज हुनमान मंदिर जटपुरा गेट येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.६ डिसेंबर रोजी दिवसभरात योगनृत्य,पूजा व आरती, भजन,रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर,होम मिनिस्टर स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा होणार आहे.७ डिसेंबर रोजी सकाळी योगनृत्य, सामान्य ज्ञान,चित्रकला व निबंध स्पर्धा होणार आहे. दुपारी फ्लॉवर सजावट स्पर्धा,आनंद मेळावा व तंबोला आणि संध्याकाळी भजनसंध्या हा कार्यक्रम होणार आहे.८ डिसेंबर सकाळी नियमित योग नृत्यू, ७ वाजता ८ ते १५ वयोगटातील मुलांसाठी खुली मॅराथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे.दुपारी ३ वाजता शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेच्या समाप्तीनंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे.आणि रात्री ८ वाजता घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.तेली समाजबांधवांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी व्हावे.तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discussion about this post