Khabarbat Pune Maharashtra India
जुन्नर /आनंद कांबळे
अनुसुचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देवू नये या मागणीस माझा पाठिंबा असून जर अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न झाला तर पहिला आमदारकीचा राजीनामा असेल असे आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.
आरक्षण बचाव आंदोलन आदिवाशी समाजाने आयोजित केले होते .त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसिल कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात समाजातील लोक सामील झाले होते.
बेनके पुढे म्हणाले ,धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे . आदिवाशी समाजाच्या आरक्षणात त्याचा समावेश करु नये .शासनाने असा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील आमदारकीचा राजीनामा देणारा आमदार मी असेन.
आदिवासी समाजाच्या बजेट मध्ये काटकसर करु नये. या समाजाचा निधी इतरत्र वळवू नये .आदिवाशीच्या न्याय व हक्कासाठी विधानसभेत आवाज उठविला जाईल.
यावेळी गणपत घोडे ,देवराम लांडे ,सुनिता बोराडे ,काळू गागरे , काळू शेळकंदे आदिनी विचार व्यक्त केले.
मोर्चाचे निवेदन नायब तहसिलदार सरिता रासकर यांना देण्यात आले.
Discussion about this post