मौदा आणि उमरेड येथे विद्युत सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन
नागपूर, दि. 14 फ़ेब्रुवारी 2024:- महावितरणच्या लघु प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वीज कर्मचा-यांनी काम करते वेळी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षेच्या साधनांचा वापर या विषयावर विद्युत सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन मौदा आणि उमरेड येथे नुकतेच करण्यात आले.
महावितरणचे जनमित्र, यंत्रचालक आणि बाह्यस्त्रोत कर्मचा-यांसाठी आयोजित या कार्यशालेत विद्युत सुरक्षेच्या साधनांचा प्रात्याक्षिकांसह वापर दाखविण्यात आला. 33 व 11 केव्ही व वाहिन्या, लघुदाब वाहिन्या, यांच्या उभारणी संबंधी तसेच त्यामध्ये आवश्यक असणारे सुरक्षीत अंतर व त्याची कारणांची विस्तृत माहिती देण्यात आली. विद्युत अपघाताची कारणे व उपाययोजना यावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये विविध प्रकारच्या संभाव्य अपघत टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, सुरक्षा साधनांचा योग्य वापर, त्याची देखभाल या विषयी कर्मचा-यांना माहिती देण्यासोबतच कर्मचा-यांशी या विषयावर चर्चा करुन त्यांना मानवी जिवनाचे महत्व विषद करण्यात आले.
इलेक्ट्रिकल शॉक लागल्यावर करावयाच्या प्राथमीक उपचारांची माहिती तसेच कृत्रीम श्वासोश्वासाचे प्रात्याक्षीके यावेळी देण्यात आली व यात कर्मचा-यांना सहभागी करुन घेत मोलाचे मार्गदर्शन केले. सोबतच आग विझविण्यासाठी वापरल्या य़ाणा-या अग्नीशमन यंत्राची कार्यपध्दती व निरनिराळया आगींच्या प्रकारमध्ये वापरण्याची यंत्र सामुग्री यावर सादरीकरण केले. आधुनीक युगात बहुमजली इमारतीमध्ये चढ-उतरण्यासाठी उदवाहकाचा वापर करण्यात येतो. तेथील आणिबाणीच्या प्रसंगात घेण्याची काळजी व सुखरुप बाहर पडण्याची उपाययोजना यावर विस्तृत मार्गदस्र्हन करण्यात आले.
मौदा येथील कार्यशाळेत महावितरणच्या नाशिक येथील प्रशिक्षण आणि सुरक्ष केंद्रातील कार्यकारी अभियंता प्रमोद पाटील, मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे यांचेसह अमरावती प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंते अनिल पानोडे व कडू, मौदा येथील उपकार्यकारी अभियंता ऊरकूडे, पांडे यांनी उपस्थित कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. तर उमरेड येथील कार्यशाळेला अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजया मडके यांनी मार्गदर्शन केले.
फ़ोटो ओळ – मौदा येथे महावितरणच्या कर्मचा-यांसाठी आयोजित विद्युत सुरक्षा कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना कार्यकारी अभियंता प्रमोद पाटील
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
Discussion about this post