[tta_listen_btn]
#हिवाळीअधिवेशन #Maharashtra #Nagpur
nagpur Winter Session । #नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत आज #विधानसभा आणि #विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. विधानभवनात आयोजित बैठकीस विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar , विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री @mieknathshinde , उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis , उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशन २०२३ दिनांक ७ डिसेंबर २०२३ ते २०डिसेंबर २०२३ असा कालावधी कामकाज सल्लागार बैठकी मधे निर्णय घेण्यात आला. *दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे.*
In the Business Advisory Council meeting of Maharashtra legislature held under presidentship of Assembly Speaker Rahul Narwekar and MLC Deputy Chairperson Dr. Neelam Gorhe, decision has been taken to hold winter session in Nagpur from Dec 7 to Dec 20. Next BAC meeting to be held on Dec 19 in Nagpur.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन #नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. #हिवाळीअधिवेशन गुरुवार ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार २० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या(शनिवार व रविवार) ४ दिवस.
विधानसभेचे अध्यक्ष @rahulnarwekar हे मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. त्यांनी गेल्यावर्षी आलेल्या काही अडचणींचा उहापोह केला व यावर्षी वीज पुरवठा, सुरक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यागतांना प्रवेश याकडे विशेषलक्ष देण्याच्या सूचना केल्या.
हिवाळी अधिवेशनाचे महत्त्व
हिवाळी अधिवेशन हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात महत्त्वाचे अधिवेशन असते. या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या कायदे, विधेयके आणि विषयांचा विचार केला जातो. या अधिवेशनात सरकारचा वार्षिक अंदाजपत्रक सादर केले जाते. याशिवाय, अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय घेतले जातात.
हिवाळी अधिवेशनाचे प्रमुख विषय
सरकारचा वार्षिक अंदाजपत्रक
इतर महत्त्वाच्या कायदे, विधेयके
कृषी, सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय
हिवाळी अधिवेशन हे महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्त्वाचे असते. या अधिवेशनात सरकारच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो आणि महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतले जातात.
#हिवाळीअधिवेशन #Maharashtra #Nagpur
Discussion about this post