Khabarbat News local Latest News
नागपूर : दरवर्षीप्रमाणे श्री हरी नगर येथील श्री संकट मोचन हनुमान मंदिराच्या प्रागंणात साजरा करण्यात आला. जवळजवळ 250 नंदीबैल या तान्ह्या पोळ्यात सहभागी झाले होते. विविध वेशभूषा करून लहान मुले, मुली यामध्ये सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांचा पोळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणाची सर्वत्र आतुरतेने वाट पाहिली जात होती. यावेळी नंदी बैलांच्या सजावटीला विशेष महत्त्व दिले गेले होते. बैलांना रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले होते.
शेतकऱ्यांचा पोळा हा एक पारंपारिक सण आहे. हा सण शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आणि कष्टाचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो. या सणात बैलांना विशेष महत्त्व दिले जाते. बैलांना शेतीत महत्त्वाची भूमिका बजावते. बैलांच्या मदतीने शेतकरी पिकांची लागवड करतात आणि त्यांची कापणी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी बैल हे एक अत्यंत महत्त्वाचे प्राणी आहे. शेतकऱ्यांचा पोळा हा एक आनंददायी सण आहे. या सणात शेतकरी एकत्र येऊन आनंद साजरा करतात.
प्रथम दहा मुलांना वेशभूषेसाठी तसेच सुंदर नंदीबैलाला नगदी पारितोषिक हनुमान मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव घोडे च्यावतीने देण्यात आले. याप्रसंगी श्री रामभाऊ कावडकर (समाजसेवक) प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सुरेश उरकुडे, रामेश्वर भुते, रामदास कोल्हे, घनश्याम ढोके , डॉ.अशोक मंदे, रामदास कोल्हे, कवडू इटनकर, रामकृष्ण कोल्हे, वासुदेव चामाटे, दुर्गाप्रसाद कावडकर, अशोक माहुरे, गुरनुले साहेब,विजय लोणारे यांनी विशेष परिश्रम घेतलेत.
Discussion about this post