Khabarbat news crime scene
कोंढाळी- येथून तिन किमी अंतरावर असलेल्या दोडकी येथिल छायाचित्रकाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दु:खद घटना आज दुपारी ३.३० चे सुमारास घडली. कार्तिक जयंत अहिरराव (२८) असे आत्महत्या ग्रस्त व्यक्ती चे नाव आहे.
दोडकी येथिल कार्तिक जयंत अहिरराव (२८) हा फोटोग्राफी चे काम करीत होता. त्यातच तिन वर्षे आधी त्याने प्रेमविवाह केला. घरी हलाखीची परिस्थिती असल्याने पत्नी माहेरी सालइ या गावी जावून माधवबाग रूग्णालयात काम करून दोन वर्षीय मुलीचा सांभाळ करीत होती. त्यातच त्याला अद्यात बिमारीने ग्रासले होते.
एकीकडे व्यवसायात तोटा व बिमारी यामुळे तो पुरता त्रासून गेला होता त्यामुळे त्याने टोकाची भुमिका घेतली व आज दि. २४/९/२३ चे दुपारी ३.३०चे सुमारास घरातील मयालीस चिधकाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या वेळी घरात दुसऱ्या कम-यात आइ वडील, आजोबा टिव्ही पाहात बसले होते. त्याच्या रूममध्ये काही तरी पडल्याचा आवाज आल्याने जावून पाहीले असता कार्तिक मृत पडलेला दिसला. त्याचे आईने कोंढाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता कोंढाळी पोलीस तपास करीत आहेत.
Discussion about this post