👉🏻म.न.पा नेहरू नगर झोन सहायक आयुक्तांना घेराव
*👉🏻राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चा प्रभाग क्र.27 च्या समस्या घेऊन सहायक आयुक्तांना निवेदन व चर्चा*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस *राहुल कामळे* यांच्या नेतृत्वात प्रभाग क्र. 27, अंतर्गत नंदनवन झोपडपट्टी, राजेन्द्र नगर येथील नागरिकांना अनेक समस्यांना घेऊन नागपूर महानगरपालिका नेहरू नगर झोन क्र.5 चे सहायक आयुक्त घनश्याम पंधारे यांचा घेराव करण्यात आला व नागरिकांना होत असलेल्या समस्या चे निवेदन देवून चर्चा करण्यात आली.
राहुल कामळे यांच्या वतीने सांगण्यात आले की प्रभागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, व आपल्या महानगरपालिका च्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वारंवार नागरिकांनी समस्या सांगून सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे त्या समस्या टाळा- टाळ करत आहेत प्रभागातील नागरिक याच्या मुळे त्रस्त झाले आहे
1) नंदनवन झोपडपट्टतील गडर सिवर लाईन अनेक ठिकाणी चोक झालेली आहे व काही ठिकाणी चेंबर खचलेले आहे ज्यामुळे नागरीकांना त्याचा दुर्गंधीचा त्रास होत आहे. डेंगु मलेरिया सारख्या जिवघेण्या आजाराची साथ (काळ) चालु आहे. परंतु तक्रार करुन सुध्दा आपले कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे.
2) नंदनवन झोपडपट्टी व कुंभारटोली ला जोडणारा जो नागनदीचा पुलिया आहे त्यावर व सुरक्षा भिंतीच्या बाजुला धावडे यांचा घराच्या मागे खुप घान, कचरा टाकला जातो आणि त्यामुळे परिसरात आजार पसरतो व नाल्याच्या बाजुला असलेल्या सर्व नागरिकांना त्याचा त्रास होतो. तरी साहेब धावडे यांच्या घराच्या मागे असलेली नाल्याच्या मलब्याची माती त्वरीत काढण्यात यावी जेणेकरून कचरा टाकणारे नागरिक कचरा टाकणार नाही. तसेच पुलाला लागत येथे कचरा टाकु नये असा एक फलक लावण्यात यावा अशी विनंती.
3) नंदनवन झोपडपट्टी व राजेन्द्र नगर परिसरात डेंगु मोठया प्रमाणात पसरलेला आहे तरी संपुर्ण परिसरात फवारणी करण्यात यावी व रोज किंवा एक दिवस नंतर फॉगींग / धुवा गाडी परिसरात पाठवावी.
4) नंदनवन झोपडपट्टी जगनाडे चौक कडुन गल्ली नं. 3 मध्ये अविनाश डांगरे यांच्या घराजवळील गडर चे झाकण तुटले आहे. ते बदलून नवीन झाकण लावण्यात यावे व सर्व वेस्ट वॉटर लाईन चे सर्व चेम्बर गाराने भरलेले आहे. पावसाळा लागूनही अजून त्या चेम्बरचा गाळ काडलेला नाही यामुळे नागरिकांना त्रास होतो याची पण आपण स्वतः पुढाकार घेवन कार्य करावे अशी विनंती.
5) नंदनवन झोपडपट्टी गल्ली नं. 13,14,15,16 व 17 या भागात गडर लाईन चे चेंबर गार काढलेला नाही आहे. मला या भागातून वारंवार नागरिकांच्या तक्रारी येतात व मी आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सांगितल्या नंतर ही त्या बाबीवर दुर्लक्ष केले जात आहे.
6) नंदनवन झोपडपट्टी बगडगंजला जोडल्या जाणाऱ्या पुलाला लगत देविदास डोंगरे यांच्या घराजवळच्या परिसरातील गडर लाईन च्या चोकेस च्या समस्या वांरवार उदभवतात नियोजन करणे गरजेचे आहे.
7) राजेंन्द्र नगर व नंदनवन झोपडपट्टीला जानारा रस्ता वानखेडे व शरनागत यांच्या भागातील सिवर लाईन चोकेस चा समस्या चे लवकरात लवकर निराकारन करावे.
8) साई मंदीर भागातील सर्व गडर लाईनचे चोकेस लवकरात लवकर काढण्यात यावे.
9) राजेन्द्र नगर चौक ते कुंभारटोली नाल्यापर्यत जाणाऱ्या रस्तायावर जागोजागी खडडे पडले आहे ते लवकरात लवकर बुजवावे ही विनंती.
10) माजी नगरसेवक रुपेश मेश्राम व स्वपनिल दहिवले यांच्या भागातील सर्व गडर लाईन व सिवर लाईन चोकेस च्या समस्या वारंवार उदभवतात याचे योग्य नियोजन करण्यात यावे.
संघटनेचे राहुल कामळे यांनी सहायक आयुक्तांना सांगितले आपण वरील सर्व विषयावर लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी व प्रभागातील सिवर लाईन व त्याचे चेम्बर नव्याने करण्याची गरज आहे. तरी या सर्व बाबीवर आपण लवकरात लवकर कार्यवाही करावी. जर या सर्व विषयावर लवकरात लवकर कार्य झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्या झोन परिसरात तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी ही म.न.पा झोन प्रशासनाची राहील.
यावर सहायक आयुक्त पंधारे यांनी आश्वासन दिले की सर्व विषयावर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन स्वता प्रभागात भेटदेऊन सर्व काम करण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष *सचिन चव्हाण,* राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव *नागेश देडमुठे,* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्य नागपूर अध्यक्ष *रवि पराते,* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्व नागपूर निरीक्षक *अमरीश ढोरे,* शहर महासचिव *राजु भोयर,* शहर महासचिव *तुषार ढबाले,* राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नागपूर शहर उपाध्यक्ष *विक्रांत मेश्राम,* उत्तर नागपूर उपाध्यक्ष *अविनाश पार्डीकर,* सोशल मीडिया विदर्भ उपाध्यक्ष *निखिल चाफेकर,* *राहुल कोथडे, स्वप्निल दहिवले, आयुष चाहांदे, बंडू उईके, रवि कडबे, श्रावण कामळे, इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते*
Discussion about this post