महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर शहरातील सर्व विधानसभा युवा आघाडी अध्यक्ष तथा कार्यकारिणी पदाधिकारी नियुक्ती
*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष मा. खा. रामदासजी तडस साहेब यांच्या आदेशान्वये व प्रदेश महासचिव मा. डॉ. भूषणजी कर्डिले, प्रदेश कोषाध्यक्ष गजानन (नाना)शेलार, सहसचिव बळवंतराव मोरघडे, सहसचिव मा. सुनीलजी चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशजी देवतळे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मा. आ. संदीपभैया क्षीरसागर, युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश एन. वैद्य व नागपूर विभागीय युवा आघाडी अध्यक्ष प्रवीण बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज नागपूर येथील कल्याणी लॉन येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर शहर युवा आघाडी सहा विधानसभा अध्यक्ष व त्यांच्या काही पदाधिकारी कार्यकारणीची नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, उपाध्यक्ष राकेश भावडकर, युवा आघाडी नागपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण बावनकुळे, विनोद बांगडे सचिव , गजानन दांडेकर कोषध्यक्ष, सुभाष ढबाले उपाध्यक्ष, शुभम लोहकरे अध्यक्ष नागपूर शहर युवा आघाडी, नरेंद्र हटवार कार्याध्यक्ष, महेश कारेमोरे सचिव, सागर नाचणकर उपाध्यक्ष, गणेश हांडे उपाध्यक्ष, भूषण शेंडे नागपूर उपाध्यक्ष इत्यादी पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्व वरिष्ठांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर विभागीय युवा आघाडी अध्यक्ष प्रवीण बावनकुळे यांनी आपल्या प्रास्तावितेतून नागपूर विभागाची कामगिरी करत असताना विशेष करून नागपूर शहरात समाजातील युवांना संघटनेत कसे स्थान देता येईल व संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नागपूर विभागाचे विभागीय उपाध्यक्ष राकेश भावडकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तर नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची सविस्तर माहिती दिली व त्यांनी सांगितले की संघटनेत प्रामाणिकपणे काम करा संघटनेत काम करीत असताना आपण कोणाच्या नेतृत्वात काम करतो हे फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्रात अनेक संघटना आहे परंतु महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा समाजाची फार मोठी संघटना आहे ज्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी काम करतात संघटनेच्या यशामुळेच मा. खासदार रामदासजी तडत साहेब यांना पक्षाने तिसऱ्यांदा वर्धा लोकसभेची तिकीट दिली त्या संदर्भात शुभेच्छा देण्यात आल्या व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या , विशाल सावरकर उपाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण युवा आघाडी इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या आनंदमय वातावरणात संताजी दुपट्टा, पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या याप्रसंगी सर्व मान्यवर तथा पवन महाकाळकर, , शुभंम वाघमारे, श्रीकांत वाघमारे,नितीन गुप्ता, शुभम धोटे, पंकज तळेकर, गोविंद गुप्ता, अर्चना ढबाले, वर्षा बांगडे मॅडम इत्यादी पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक विनोद बांगडे यांनी केले तर आभार नरेंद्र हटवार यांनी मानले सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
Discussion about this post