जुन्नर /आनंद कांबळे
पुणे येथील हाफकिन येथील कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण वाघमारे यांना राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहिर झाला.
गेल्या २८वर्षापासून हाफकिन मध्ये काम करत आहेत. कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून गेली १५वर्षे काम पहात आहेत. कारखाना जगला तरच कामगार जगेल या विश्वासाने कामगाराचे हित पहात आहेत .याशिवाय व्यसनमुक्ती साठी काम पहात आहेत. रक्तदान व आरोग्य शिबीर घेवून जनसेवेचा वसा जोपासला आहे. अंध व अन्य मुलांना मदतही करत आहेत.
येत्या २६आँक्टोबर रोजी मुंबई येथे राज्यपाल महोदयांच्या हस्ते पुरस्कार वितरण होत आहे,
Discussion about this post