संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.३१.
गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या स्थानिक गोठणगाव येथील एका ५ वर्षीय मुलीवर काल शुक्रवार (दि. ३०) रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास बिबट वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या मुलीचे नाव युक्ता मारोती निखारे (वय ५ वर्ष) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार,ती काल शुक्रवारला रात्री ९.१५ सुमारास घरामागे असलेल्या शौचालयात गेली होती.शौचालयातून परत घरी येत असताना बिबट वाघाने हल्ला करून तिला जखमी केले.दरम्यान तिचा किंचाळण्याचा आवाज आल्याने तिच्या घरचे व शेजारील लोक धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.तिच्या मान आणि डोक्यावर बिबट्याची नखे खोलवर गेल्याने बराच रक्तस्त्राव झाला आहे. लागलीच तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.पुढील उपचारासाठी अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.ती सध्या सुखरूप असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मागील सहा महिन्यांपूर्वी अंगणात खेळत असलेल्या एका मुलीवर बिबट वाघाने हल्ला करून तिला काही अंतरावर फरफटत नेले होते. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. ती घटना ताजी असतांनाच (दी.३०) रोजी रात्री पुन्हा एका सहा वर्षीय मुलीवर वाघाने हल्ला केला आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. लोक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना घाबरत आहेत.
गोठनगाव येथे बिबट वाघ आणि अन्य जंगली प्राण्यांचा वावर वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी अधिकच सतर्क राहण्याचा इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे.
नागरिकांनी स्वतःची काळजी घेत रात्रीच्या सुमारास एकट्याने बाहेर पडू नये. दोन किंवा तीन जणांचा समूहाने बाहेर जावे, हातात काठी, टॉर्च मोबाईलचे गाणे वाजवत जावे.शाळकरी व लहान मुलांना एकट्याने सोडू नये.
-मिलिंद पवार वनपरीक्षेत्राधिकारी
गोठणगाव.
वनविभागाने गोठणगाव परिसरात त्या धुमाकूळ घालणाऱ्या बिबट वाघाचा बंदोबस्त करावा.गावात वन्य प्राण्यांचा वावर फार वाढला आहे.आता ही दुसरी घटना आहे.त्यामुळे गावात खूप भीतीच्या वातावरण आहे.हल्लेखोर बिबट्याला वन विभागाने तात्काळ जेरबंद करावे.जखमी मुलीला आर्थिक मदत करावी.
-आम्रपाली डोंगरवार सभापती,
पंचायत समिती अर्जुनी मोरगाव.













Discussion about this post