अखेर कित्येक दशकाची प्रतीक्षा संपली
हडस्ती – चारवट ग्रावाला मिळाली रस्त्यांनी विद्युत
बल्लारपूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या हडस्ती, चारवट गावाला वर्धा, इरई नदीच्या पुराचा तडाखा दरवर्षी बसतो आणि शेतशिवरातून विद्युत खांबाद्वारे होणारा वीज पुरवठा खांब पुराच्या पाण्याखाली आले की; एकेक, दोनदोन हप्ते खंडित व्ह्याचा त्यामुळे पुरच्या पाण्याने वेढलेल्या गावकऱ्यांना नाईलाजास्तव काळोखात दिवसे काढावे लागत असे ही अनेक दशकापासूनची असलेली समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी कित्येकदा प्रशासनाला निवेदन दिले अखेर त्यांची प्रतीक्षा संपली त्यांना आता उंच खांबद्वारे गावला जोडणायाऱ्या रस्त्यानी विद्युत पुरवठा करण्यात आला आहे त्यामुळे गावकऱ्यांचे सुटकेचा निःश्वास सोडला.
बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त गाव म्हणून हडस्ती, चारवट गावाला ओळखल्या जाते वर्धा, इरई दोन्ही नदीच्या मधात वसलेल्या गावाला पुराचा तडाखा दरवर्षी बसतो २००६ पुराततर त्यांना तिथून काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा आधार घ्यावा लागला माजी दिवंगत गृहमंत्री आबा पाटील यांनी या गावाला भेट देवून त्यावेळी हडस्ती येथे पुलाची निर्मिती केली त्यामुळे गावाला काहीसा आधार मिळाला.
Discussion about this post