पेलोरा येथे ज्ञानेश्वरी पारायण व ग्रामगीता वाचन सप्ताहाचा समारोप
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार संपन्न
चंद्रपूर (प्रतिनिधी) – दत्तात्रय मंदिर, संत बाजीराव महाराज देवस्थान , जगन्नाथ महाराज मंदिर आणि पेलोरा ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण तथा ग्रामगीता वाचन सप्ताहाचा समारोप पेलोरा गावी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सप्ताहात विठ्ठल दाते, गुणवंत गांवडे, शालिक गागरे, महादेव वानखेडे, सचिन पानघाटे, केशव अडबाले, मोहन वाघाडे यांनी ग्रामगीता वाचन केले तर हरिदास गोवारदीपे, गरूड बोंडे,सौ. पुष्पाताई वाटकर, देवराव ठावरी, सुधाकर तुरानकर, चिंतामणी खडसे आदींनी ज्ञानेश्वरी विषयावर प्रवचने दिलीत. कीर्तन सेवा देवराव वाघमारे, आकाश ताविडे, रेणुके महाराज, विलास कुळसंगे, बालाजी महाराज, डॉ. उदार यांनी प्रस्तुत केली तर सामुदायिक प्रार्थनेवर भाषणे प्रकाश उरकुडे, मुरलीधर माहुरे, धनराज लांडे आदींनी दिलीत. समारोप प्रसंगी मसे महाराज यांनी सादर केले तर समारोपीय भाषण ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी मुरलीधर माहुरे, सचिन पानघाटे आणि धनराज लांडे यांनी सांभाळली. ग्राम भजन पालखी दिंडीत जैतापूर, कवठाळा, गडचांदूर, मारडा, रामपूर आदी अकरा गावांनी सहभाग नोंदविला. सप्ताहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पेलोरा गावातील ज्येष्ठ नागरिक शामसुंदर झाडे,गोविंदा कौरासे, रामदास राजुरकर, वासुदेव कौरासे, नामदेव बोढेकर, पांडुरंग टेकाम, महादेव बोधे, नामदेव कायरकर, पांडुरंग कौरासे, शामराव खुजे, अनुसयाबाई झाडे, रुखमाबाई लांडे, जनाबाई बोढेकर, राधाबाई कौरासे, वच्छलाबाई बोढेकर, तुळसाबाई बोधे तसेच ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, धनराज लांडे, पोलिस पाटील माधुरी खुजे, प्रा. फुटाणे, श्रीधर लांजेकर , प्रभाकर खुजे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या महोत्सवात तेलंगण राज्यातील भाविक लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
Discussion about this post