झाडीबोली साहित्य मंडळातर्फे बालिका दिनानिमित्त महिला रत्न पुरस्कार वितरण
(प्रतिनिधी)
– कवयित्रींनी कविता लेखन प्रकारासोबतच इतर साहित्य प्रकार म्हणजेच कथा, कादंबरी, प्रवासवर्णन व चरित्रपर लेखन करून विविध ग्रंथांची निर्मिती करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या एड. पारोमिता गोस्वामी यांनी चंद्रपूर येथे केले . झाडीबोली साहित्य मंडळ आणि नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने बालिका दिन निमित्ताने निमंत्रित कवयित्रींचे कविता वाचन व सावित्रीबाई फुले महिला रत्न पुरस्कार वितरण प्रसंगी त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन तुकूम श्रीगुरुदेव सेवा मंडळ राऊत ले-आऊट, सामुदायिक प्रार्थना मंदिरात करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या हस्ते झाले .तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कवियित्री सौ. शशिकला गावतुरे, एफईएस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संगिता बुटले उपस्थित होत्या.
श्री .बोढेकर यांनी ग्रामगीतेतील विसाव्या अध्याय महिलोन्नती संबंधाने विचार व्यक्त केले तर लता वाडीवे यांनी आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घेतली असून याकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी दिलेली शिक्षणाची प्रेरणा महत्त्वाची ठरली असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी सामाजिक क्षेत्रातील अँड. पारोमिता गोस्वामी (सामाजिक क्षेत्र ), सौ. संगिता बुटले (शैक्षणिक सेवा), सौ.प्रतिभा रोकडे (योग प्रचार प्रसार), सौ. रजनी बोढेकर (आरोग्य मार्गदर्शन),सौ. शुभांगी अनमुलवार (श्रीगुरुदेव सेवाकार्य) यांना भागाबाई कामडी स्मृती सावित्रीबाई फुले महिला रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पहिल्या सत्रात कवयित्री सौ .शशिकला गावतुरे,संगिता मालेकर, रोहिणी मंगरुळकर, मंजूषा खानेकर , आदींनी कविता वाचन केले व त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी मंगरूळकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे यांनी केले. आभार मंजूषा खानेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवराव कोंडेकर, अभय घटे, सरिता बेले , छाया टिकले, नामदेव गेडकर, देवराव बोबडे, रामराव धारणे, बबन अनमुलवार, दयाराम नन्नावरे , गराटे आदींनी परिश्रम घेतले.
Discussion about this post