हडस्तीत जगन्नाथबाबा पालखी सोहळ्याला भाविकांची गर्दी
पंचक्रोशितील तब्बल ४० भजन मंडळांचा सहभाग
माँ कामाक्षी म्युझीकल ग्रुप नागपूर यांनी जगन्नाथ बाबांच्या गान्यानी हडस्ती नगरी दुमदुमवुन टाकली
श्री सद्गुरू जगन्नाथबाबा देवस्थान समिती हडस्तीच्या वतीने जगन्नाथबाबा मूर्ती स्थापना व मारोती महाराज जन्म सोहळा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये पंचक्रोशितील तब्बल ४० भजन मंडळांनी व माँ कामाक्षी म्युझीकन ग्रुप नागपूर यांनी अवधी हडस्ती दुमदुमून टाकली होती.
दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी पहाटे तरुण वर्ग व समस्त गावकऱ्यांनी ग्राम स्वच्छता केली. त्यानंतर घटस्थापना व किर्तनकार ह.भ.प. श्री. सुरपाम महाराज यांनी जगन्नाथ बाबा यांचे जिवणावर किर्तन केले. दुसऱ्या दिवशी पहाटे मारोती महाराज यांच्या हाताने हवनपुजा करण्यात आली व ग्रामस्वच्छता त्यानंतर महिलांनी आपापल्या घरासमोर व दिंडीच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या. शेतकरी बांधवांनी शेतीच्या कामाला उमंत घेऊन पालखी मोहळ्याला उपस्थित दर्शवली. एकंदरीत समस्त गावकरी उत्साहाच्या तयारीला लागला होता. सर्व भक्तांच्या मुखातुन जय जगन्नाथ जय जगन्नाथ नीघत होते व मोठ्या भावभक्तीने पालखी सोहळा भजनासह गावामधून काढण्यात आली. पालखी सोहळ्याला अलोट गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पंचक्रोशितील हजारो नागरिकांची उपस्थिती सदर सोहळ्याला होती. गावातील तरुण मंडळी व भजन मंडळ यांनी भाविकांसाठी अल्पोहाराची व्यवस्था केली. मारोती महाराज यांचे हातानी दहीहंडी फोडण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी पालखी सोहळ्याला उपस्थित भजन मंडळांचा सत्कार करण्यात आला. तसेच कीर्तनकार खेमराज महाराज कायर पिपरी, महेश महाराज मिरळी हेटी, वामन महाराज हिरापुर, मोरधर महाराज कोसारा बांचा सुध्दा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी श्री सद्गुरू जगन्नाथबाबा देवस्थान समिती हडस्ती व समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Discussion about this post