चंद्रपुरातील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी काँग्रेसमध्ये; डॉ. आंबेडकर जयंतीदिनी मोठा निर्णय
निसर्ग व पर्यावरणासाठी समर्पित आणि सामाजिक कार्यकर्ता अशी ख्याती असलेले, भारत सरकार चा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त व चंद्रपूर जिल्हाचा गौरव असलेले श्री. बंडू सितरामजी धोतरे (Bandu Dhotre) यांनी देशाची राजकीय परिस्थिती बघता काँग्रेस पक्षाचे सदस्य होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोली ते वाशिम पर्यंत ते पदयात्रेत देखील सहभागी झाले होते हे विशेष.
भारत देश त्याच्या इतिहासाच्या एक निर्णायक टप्प्यावर आहे. अशा परिस्थितीत नैतिक आवाज व पद असलेला कोणताही व्यक्ती राजकीय व सामाजिक दृष्ट्या शांत आणि तटस्थ राहू शकत नाही, कारण देशाच्या आत्म्यालाच धोका आहे. सोबतच, देशात एकंदरीत फक्त भांडवलशाहीस पोषक असे वातावरण निर्माण करून जल, जंगल, जमीन व जन (जनतेच्या) हिताचा विचार न करता अव्याहतपणे नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास देशात सर्वत्र सुरू झाला असून, विकासाच्या नावाखाली निवडक आणि विशिष्ट उद्योगासाठी प्रयत्न केले जात असल्याचे चित्र आहे, असे नमूद केले आहे.

सोबतच, लोकशाहीत विरोधी पक्षाना अनन्यसाधारण महत्व असते. मात्र देशात व राज्यात सध्याचे राजकारण बघता देशातील लोकशाहीकरिता पोषक वातावरण राहील की नाही अशी शंका व्यक्त करित, चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरणाशी नाड जुडलेला उमदा समाजसेवक महामानव विश्वरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्य आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य व एक समर्पित कार्यकर्ता होण्याची इच्छा व्यक्त करणारे पत्र चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे यांना पाठविले. त्यावर त्यांनी लगेच स्वागत करीत पत्र दिले.

पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोतरे यांनी काँग्रेसच्या सामाजिक व राजकीय कार्यात अधिक सक्रीय होत काँग्रेस विचारसरणीत सामिल होऊन कॉंग्रेसच्या जन आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे.
Discussion about this post