बांबू प्रयोगशाळा स्थापन करणे ही राष्ट्रसेवा आहे – श्रीनिवास राव, व्यवथापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ*
क्याटालायझर फाउंडेशन द्वारे राष्ट्रीय बांबू दिनाचा लोगो, संकेतस्थळ आणि बांबू गीताचे अधिकृतपणे अनावरण
नागपूर, २७ फेब्रुवारी :- महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या प्रस्तावाद्वारे कोणीही बांबू प्रयोगशाळा उभारू शकेल, त्याला अखेरीस राष्ट्रीय बांबू अभियानाचे सहकार्य मिळेल, ही त्या क्षेत्राची आणि राष्ट्राची मोठी सेवा असेल, असे महाराष्ट्र बांबूने विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव यांनी सांगितले. त्यांनी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय बांबू दिनाच्या अधिकृत वेबसाइट आणि लोगोचे अनावरण केले. यावेळी सर्व उपस्थितांना बांबू गीत देखील ऐकविण्यात आले.
श्रीनिवास राव म्हणाले की, राष्ट्रीय बांबू मिशनच्या (NBM) मार्गदर्शक तत्त्वांनुसार ओळख अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही बांबूच्या स्थानिक प्रजातींना प्राधान्य देत बांबूच्या सुमारे १९ प्रजाती निवडल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
१०१ बांबूसेटम प्लांटेशन प्रोजेक्ट, बांबू फार्मर्स कार्बन क्रेडिट प्रोग्रामची अधिकृत घोषणा आणि लॉन्चिंग या प्रसंगी करण्यात आले.
महाराष्ट्र इकोटूरिझम बोर्डाचे महाव्यवस्थापक किशोर मिश्रीकोटकर यांनी या उपक्रमाबद्दल कायटलायझर फाऊंडेशनचे अभिनंदन केले आणि आपले विचार उपस्थितांसमोर मांडले. ते म्हणाले की, बांबू लागवड आणि इतर उपक्रमांमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि संवादात्मक असावी.
त्यांच्या भाषणानंतर, क्याटालायझर फाऊंडेशनचे संस्थापक आशिष कासवा यांनी शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सोपी ठेवण्यात आल्याचे आश्वासन दिले आणि ते पूर्णपणे विनामूल्य असेल असे सांगितले. प्रेक्षकांना महत्त्वाची माहिती देण्यासाठी बांबू लागवड आणि बांबूसेटम या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही दाखवण्यात आले.
जागतिक बांबू दिन आणि SAbF चे संस्थापक श्री. कामेश सलाम यांनी थायलंडमधील जागतिक बांबू दिनाच्या समारंभावर आणि बांबू आणि कार्बन शेतीवर भाष्य केले. डॉ. मुरलीधरन ई.एम., निवृत्त शास्त्रज्ञ – KFRI आणि अध्यक्ष, INBAR आणि टास्क फोर्स (शास्वत बांबू व्यवस्थापन) यांनी बांबू लागवड संस्कृती आणि शाश्वत बांबू संस्कृतीची अंमलबजावणी करून तिच्या वैज्ञानिक प्रक्रियेच्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला.
प्रारंभी, डॉ. मनोज सालपेकर जी यांनी कॅटालायझर फाऊंडेशनचा उपक्रम आणि बांबूचे शाश्वत व्यवस्थापन आणि राष्ट्रीय बांबू दिन साजरा करण्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.
त्यानंतर बांबू गीताच्या निर्मितीमागील कथा त्याचे निर्माते वास्तुविशारद सुनील जोशी यांनी सांगितली.
श्रीमती सुजाता आशिष कासवा यांनी राष्ट्रीय बांबू दिनानिमित्त आदरणीय केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी जारी केलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले.
नंतर क्याटालायझर फाउंडेशनचे संस्थापक आशिष कासवा यांनी महाराष्ट्र शासनाचे माननीय वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांना संदेश दिला. त्यांनी २०१० पासून बांबू संस्कृतीशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल सांगितले, वेदांच्या प्राचीन शिकवणीपासून ते आधुनिक संशोधनापर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा केली ज्यामुळे शेवटी त्यांना बांबू लागवड आणि इतर उपक्रमांकडे जाण्यास प्रेरित केले.
त्यांनी जाहीर केले की, बांबू उत्पादक शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा लाभ मिळेल कारण क्याटालायझर फाऊंडेशनने नुकताच एका अमेरिकन कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. बांबू उत्पादक शेतक-यांची कृषी पाहणी व्यवस्था करण्यासाठी आजपासूनच नोंदणी सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मनोज सालपेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन क्याटालायझर फाउंडेशनचे सहसंस्थापक प्रतीक कासवा यांनी केले.
Discussion about this post