khabarbat news | Humanities Group
चंद्रपूर, २३ सप्टेंबर २०२३ – स्पंदन रोहनकर यांच्या १७ व्या वाढदिवसानिमित्त माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून डेबू सावली वृद्धाश्रमात जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला माणुसकी ग्रुपचे सदस्य, रोहनकर कुटुंबीय, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. स्पंदन शिक्षणासाठी बाहेरगावी असल्यामुळे ते उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून सामाजिक कार्य केले. यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.
यावेळी माणुसकी ग्रुपचे अध्यक्ष प्रा.विजय रोहनकर, उपाध्यक्ष वैशाली रोहनकर, सचिव रंजना आरिकर, तसेच माणुसकी ग्रुपचे सदस्य हरीश ससनकर, निशा धोंगडे, डी.के. आरिकर आदी उपस्थित होते. माणुसकी ग्रुपने या उपक्रमाद्वारे गरजू वृद्धांना मदत करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले.
संपर्क
माणुसकी ग्रुप, चंद्रपूर
8055407941/8999645084












Discussion about this post