News34
चंद्रपूर – दरवर्षी चंद्रपुरात येणारा नैसर्गिक पूर पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे, पूर आला की पंचनामे नुकसान भरपाई हे सुरूच असते मात्र त्यावर नियोजन शून्य कारभार या नैसर्गिक पुराला कारणीभूत आहे त्यावर मात्र कुणी काही बोलत नाही. पावसाळ्यातील प्रत्येक नागरिकांच्या या समस्येवर एकमात्र उपाय
4 महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाच्या महिला अध्यक्ष एड.सुनीता पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत इराई नदीच्या खोलीकरणाची मागणी केली होती मात्र त्यावर प्रशासनाने काही एक कृती केली नाही. NRHM च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
चंद्रपुरातील जनप्रतिनिधी इराई नदीच्या खोलीकरण विषयावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करतात विशेष म्हणजे आजपर्यंत खोलीकरण यशस्वी रित्या पूर्ण झाले नाही, त्याचा परिणाम शहरात वारंवार पूर सदृश स्थिती निर्माण होत आहे.
जुलै महिन्यात एका दिवसात आलेल्या मुसळधार पावसाने प्रशासनाची पोलखोल केली आहे, शहरातील प्रत्येक भाग यंदा पावसाखाली गेला होता, नागरिकांच्या घरात पाणी शिरले, आठ दिवसांच्या आत नाले सफाई व इराई नदी खोलीकरणाचे काम सुरू झाले नाही तर आम आदमी पक्ष आंदोलन उभारेल या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळात आम आदमी पक्षाच्या महिला अध्यक्ष सुनीता पाटील, संघटन मंत्री भिवराज सोनी, सरफराज, सुनील सदभैया, तबसुम शेख, कुशाब कायरकर, सिकंदर सागोरे, जासमीन शेख, वंदना कुंदावार, राणी जैन आदींची उपस्थिती होती.
Discussion about this post