चंद्रपूर: नर भक्षी वाघांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन
चंद्रपूर, 20 नोव्हेंबर 2023: राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी (20 नोव्हेंबर) बाबूपेठ भागात वाघाच्या हल्ल्यात 53 वर्षीय मनोहर वाणी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मनोहर वाणी विद्यानिकेतन स्कूल बस ड्रायव्हर, वय 52 राहणार आंबेडकर नगर संत तुकाराम चौक बायपास जुनोना रोड , हा आज दिनांक 20 नोव्हेंबर 23 ला सकाळी जुनोना शनी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले.
मनोहर वाणी हा श्री जैन सेवा समिती संचालित विद्यानिकेतन हायस्कूल दादावाडी येथील स्कूल बस ड्रायव्हर म्हणून मागील पंधरा वर्षा पासून कार्य करीत होता.
त्याच्यामागे दोन मुली व पत्नी असा परिवार आहे. सरकारने मनोर वाणीच्या कुटुंबाला ताबडतोब आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी विद्यानिकेतन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा आप्तजना कडून करण्यात येत आहे.
मनोहर वाणी हा श्री जैन सेवा समिती द्वारे संचालित विद्यानिकेतन शाळेचा कर्मचारी असल्यामुळे संस्थेने सुद्धा या दुःखद प्रसंगी त्याला आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागाचे अध्यक्ष श्री विवेक आंबेकर यांनी केली आहे.
मनोहर वाणी हे सकाळी शनी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. तेथेच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला.
घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
वनविभागाशी चर्चा केल्यावर तपास पूर्ण झाल्यावर वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन कुडे यांना मिळाले.
बाबूपेठ भागातील जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून 2 वन्यप्राणी नियमित फिरत आहेत. ज्यामध्ये बिबट व वाघाचा समावेश आहे. या दोन्ही वाघाचा तात्काळ बंदोबस्त करणे गरजेचे आहे. या परिसरात 2 पिंजरे लावावे तसेच टॉवर टेकडी परिसर जंगल लगत सीमेवर सोलर स्ट्रीट लाईट लावण्यात यावे अशी मागणी कुडे यांनी केली आहे.
वाघाचा बंदोबस्त न केल्यास वनविभाग विरोधात आंदोलन करण्याचा इशारा कुडे यांनी दिला आहे.
Discussion about this post