News34 anti corruption news
चंद्रपूर – लाचलुचपत प्रतिबंधक चंद्रपूर विभागाच्या पोलीस उप अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच मंजुषा भोसले यांनी कारवाईचा धडाका लावला आहे.
चंद्रपुर तालुका पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या घरकुल योजनेची तिसरी किस्त जमा करण्यासाठी कंत्राटी अभियंता यांनी 5 हजार रुपयांची मागणी केल्याने त्याला तडजोडी अंती 2 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. मोठ्या तंबाखू माफियावर कारवाई कधी?
तक्रारदार हे चंद्रपूर तालुक्यातील मौजा निंबाळा येथे राहतात वर्ष 2021 ते 22 या आर्थिक वर्षकरिता फिर्यादी यांना घरकुल मंजूर झाले होते, त्यांच्या घराचे बांधकाम सुरू झाले, 2 किस्त जमा झाल्या त्यांनतर पुन्हा 2 किस्त जमा होणे बाकी होते, तिसरी किस्त तब्बल 45 हजार रुपये जमा करण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण गृह निर्माण चे कंत्राटी अभियंता 33 वर्षीय स्वप्नील बबन निमगडे यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली.
मात्र फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.
फिर्यादी यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला तडजोडीअंती निमगडे यांनी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. सध्या पुढील कारवाई सुरू आहे. इराई नदीच्या खोलीकरणाचे काय झाले?
पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै महिन्यात 2 कारवाया करण्यात आल्या आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, कर्मचारी रमेश दुपारे, अरुण हटवार, नरेश कुमार ननावरे, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, राकेश जांभुळकर, मेघा मोहूर्ले व सतीश सिडाम यांनी केली.
Discussion about this post