News34
चंद्रपूर – गेल्या दीड दोन वर्षापासून केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजनेची कुठलीही निधी प्राप्त झालेली नव्हती, राज्य सरकारने 407 डी पी आर मध्ये आपले कोट्याची निधी महाविकास आघाडी सरकार असताना त्याच वेळी दिली होती.
परंतु केंद्र सरकारची उर्वरित निधी देण्यात आली नसल्यामुळे बरेचसे लोकांचं अर्धवट काम थांबलेले होते, कोणाचा स्लॅप तर कोणाचं प्लास्टर अडकून असल्यामुळे आवास योजनेचे निधीची वाट पाहता पाहता स्वतःच घर सोडून भाड्याने राहत होते.
हे सर्व गोरगरीब लोकांना न्याय मिळवण्याकरिता चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून बरेच वेळा आंदोलन करण्यात आले, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची भेटूनही निवेदन वेळोवेळी देण्यात आले, आठ दिवस अगोदरच विठ्ठल मंदिर वॉर्ड प्रभागांच्या लोकांची प्रधानमंत्री आवास योजनेची निधी संदर्भात महानगरपालिका समोर एक दिवसीय धरणे आंदोलन राहुल देवतळे व त्यांचे सहकाऱ्यांसोबत करण्यात सुद्धा आले होते.
ह्याची दखल घेऊन अधिकारी व नेत्यांना जाग आली आणि कालच महानगरपालिका मध्ये 407 डी पी आर चा गरजू लोकांना पहिला हफ्ता आलेला आहे.
Discussion about this post