[tta_listen_btn]
महाशिवराञीचा उत्सव तरुणांई उत्साहाने साजरा करतात तर काही हौशी मुलं धाडसी कार्यक्रम आखतात. शहरातील दहा ते बारा तरुण मुलांनी पटाळा येथील वर्धा नदीत जलतरण करण्याचा निर्णय घेतला. त्यातील तीन तरुणांना जलसमाधी मिळाल्याची धक्कादायक बाब शुक्रवार दिनांक 8 मार्च ला दुपारी घडली.
संकेत पुंडलिक नगराळे, अनिरुद्ध चाफले व हर्षद चाफले ही विशीतील तरुण वर्धा नदीत मृत्युमुखी पडले. हे तिघेही विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास होते. महाशिवराञी निमित्य विविध कार्यक्रमांची रुपरेषा आखल्या जाते. काही तरुण देवदर्शन करतात तर काही तरुण “एन्जॉय” करण्यासाठी अनेक ठिकाणी जातात. तसेच शहरातील दहा ते बारा तरुणांनी लगतच असलेल्या पटाळा परिसरातील वर्धा नदीवर पोहण्याचा निर्णय घेतला.
विठठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेला एक तरुण पाण्याच्या प्रवाहाने वाहुन जात असल्याचे दिसल्याने दुसऱ्या तरुणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला माञ तीन मुलं वाहुन गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार घडताच अन्य मुले घाबरली त्यांनी याप्रकरणी पोलीसांना व घरच्या मंडळींना वार्ता कळवली. पोलीसांनी घटनास्थळ गाठले वाहुन गेलेल्या मुलांचा शोध आरंभला तर घटनेची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली. मृतदेहांची संयुक्त शोध मोहीम सुरू आहे.
Discussion about this post