सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र
नागपूर दि: आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीजबिल थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणच्या नागपूर परिमंडलात सुरू आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणचे मोबाईल ॲप, संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या विजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मार्च अखेरपर्यंत सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. त्यानुसार महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवार, शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुरु राहतील. उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकारी वसुलीसाठी ‘ऑनफ़िल्ड’
वीजबिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकांची प्रत्यक्ष भेट घेत, त्यांना वीजबिलांचा भरणा त्वरित करण्याचे आवाहनासाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक, सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार आणि काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक धाव यांनी गुरुवारी (दि. 28 मार्च) कळमेश्वर, मोहपा शहर शाखा, मोहपा शहर शाखा, कोहळी शाखा, कोंढाळी शाखा कार्यालया अंतर्गत असलेल्या थकबाकीदार ग्राहकांची प्रत्यक्ष भेट गेतील ग्राहकांसोबत चर्चा करून थकबाकीसह चालू वीज बिलांचा भरणा करण्याचे आवाहन केले. वईजबिल वसुली मोहीम अधिक प्रभावी करून जस्तीतजास्त थकबाकीची वसुली करण्याचे निर्देश सुहास रंगारी आणि दिलीप दोडके यांनी महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना केले. उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता चंदन तल्लरवार आणि मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे यांनी देखील आपल्या विभागातील ग्राहकांच्या भेटी घेत वीज बिलाचा भरणा त्वरीत करण्याचे आवाहन केले.
महावितरण ॲक्शन मोड वर
महावितरणची सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी सुरु राहणार असल्याने उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले असून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले आहे.
Post Views: 158
Discussion about this post