Maharashtra: Ink thrown at cabinet minister Chandrakant Patil in Solapur
महाराष्ट्र: सोलापुरात नवे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली
सोलापूर : राज्याचे नवे कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर रविवारी सोलापुरात शाई फेकण्यात आली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज ते सात रास्ता येथील शासकीय अतिथीगृहात मुक्कामी असून उद्या (सोमवारी) ते प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दरम्यान, गेस्ट हाऊसमध्ये जात असताना भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने नवे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाने ‘खाजगीकरण बंद करा’च्या घोषणाही दिल्या. पोलिसांनी त्याला पकडून बाजूला नेले आणि नंतर पोलीस ठाण्यात नेले. अजय मैंदर्गीकर असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे.
पुण्यातील शाई फेकण्याच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील चांगलेच सावध आहेत.
Maharashtra: Ink thrown at cabinet minister Chandrakant Patil in Solapur
Solapur: Ink was thrown at Chandrakant Patil, the new cabinet minister and the state’s higher and technical education minister, in Solapur on Sunday. The incident has caused a stir in the state.
Chandrakant Patil is on a tour of Solapur. He is staying at the government guest house on Saat Rasta today and is scheduled to have a meeting with administrative officials tomorrow (Monday). Meanwhile, while going to the guest house, a Bhim Army worker tried to throw ink at the new cabinet minister Chandrakant Patil. The young man also raised slogans of ‘Stop privatization’ at that time. The police caught him and took him aside and then took him to the police station. The young man’s name is reported to be Ajay Maindargikar.
Chandrakant Patil is very cautious after the ink throwing incident in Pune.
Discussion about this post