कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला.
२५ मुले,महिला व पुरुष जखमी.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३.
देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधुमाशाने हल्ला केल्यामुळे २५ मुले,महिला जखमी झाले आहेत.
येरंडी देवलगाव येथे दिनेश लक्ष्मण बागडे यांच्याकडे जेवनाचा कार्यक्रम आज दिनांक ३ एप्रिल रोज शुक्रवारला आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने नातेवाईक आले होते. येथून नजीक असलेल्या कवठा येथील कोकणाई मंदिरात देवदर्शनासाठी कुटुंबीय व नातेवाईक गेले होते. सुमारे एक एक ते दीड वाजेच्या दरम्यान मंदिरात नैवेद्य व देवदर्शनासाठी जात असताना मंदिरात प्रवेश करत असतानाच मधमाशांनी हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळ उडाला. मधमाशांनी तेथे उपस्थित असलेली लहान मुले,महिला यांना चावा घेतला.
दिनेश यांनी मधुमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेला लहान मुलांना,महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल केले. उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप आनंद, आधी परिचारिका पूजा सोनवाणे यांनी रुग्णांवर तात्काळ उच्चार केला.
जखमी झालेल्यांमध्ये फॅमिला विकास तरोणे (३२ वर्षे),कुणाल विकास तरोणे(१२ वर्ष) माही विकास तरोणे (१० वर्ष) सुनीता नामदेव तरोणे (४२ वर्ष) राहणार सर्व सावरटोला,काजल दिनेश बागडे (२७ वर्षे),तेजस दिनेश बागडे (दीड वर्ष) सुषमा कृष्णा बागडे (२५),प्रिन्स कृष्णा बागडे (१० वर्ष),काजल दिनेश बागडे (२७) ,आयुष सेवकराम नेवारे (१०वर्षे ),जीवनकला अविनाश नेवारे (४२), दर्पण महेश राऊत (११),पार्वता भागवत राऊत (६०),सविता रोशन बागडे (२५),मीराबाई नीलकंठ हेमने (३३), प्रतीक्षा अविनाश नेवारे (२३)दिव्या उमेश मेंढे (१४),अंतरिक्ष दिगंबर राऊत (१८), विजया विष्णू कोवे (६५), रिंकल रोशन बागडे (३ वर्ष), श्रेयांस दिनेश बागडे (६ वर्ष),सलोनी महेश राऊत(१६),कुणाल उमेश मेंढे (१४ वर्षे) राहणार सर्व येरंडी देवलगाव,चीपेश्वर सुरेश पातोडे (१८)राहणार परसोडी ,कल्याणी विश्वनाथ दुधकुवर (१६ वर्षे)राहणार चोप कोरेगाव.असे एकूण २५ मुले,महिला व पुरुष या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
या घटनेची अर्जुनीमोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांना माहिती मिळताच,त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे येऊन सर्व जखमींची भेट घेऊन विचारपूस केली तसेच त्यांना धीर दिला.तसेच उपचारा संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद यांना निर्देश दिले.यावेळी पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे,जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर,जयंत लांजेवार,लैलेस्वर शिवणकर,नवल चांडक,जितेंद्र कापगते, कुंजीलाल कुंभारे,संजय खरवडे उपस्थित होते.दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आला.ज्यांच्या प्रकृतीला संभाव्य धोका आहे,अशा सहा रुग्णांना पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
-डॉ. प्रदीप आनंद,वैद्यकीय अधिकारी,
ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध.











Discussion about this post