चंद्रपूर : गणपती चे विसर्जन असोलामेंढा नहारात करतांना 3 जण वाहून गेल्याची घटना सावलीइथे घडली. यातील 1 जण सापडला. मात्र रुग्णालयात भरती केले असता मृत घोषित करण्यात आले. सावली शहरातील वार्ड क्रमांक 14 येथील जय बजरंग गणेश मंडळाच्या विसर्जनादरम्यान ही घटना घडली. मृत युवकाचे नाव गुरुदास दिवाकर मोहूर्ले (वय 25 वर्षे) असे आहे. तो सावली शहरातील चांदली येथील रहिवासी होता. तो जय बजरंग गणेश मंडळाचा सदस्य होता.
सावली शहरातील सावलीचा राजा, सावली चा विघ्नहर्ता व जय बजरंग युवा गणेश युवा मंडळ असे तीन सार्वजनिक गणेश चे विसर्जन दिनांक 30 ला करण्यात आले. तिन्ही गणपती सावली शहराच्या प्रमुख मार्गाने विसर्जन स्थळी आले. राजा व विघ्नहर्ता हे दोन गणपती हे स्थानिक लहान तलाव मध्ये विसर्जन करण्यात आले. एक जय बजरंग बली चा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करण्यासाठी गेले. गणपती विसर्जन करतांना पाण्याच्या प्रवाहात जवळपास 5 युवक बुडाले. मात्र मात्र त्यातून 2 जण बाहेर निघाले. मात्र चांदली येथील गुंडावार बंधू व गुरूदास दिवाकर मोहूर्ले हे वाहून गेले. काही अंतरावर गुरू मोहूर्लेला बाहेर काढण्यास यश आले. त्याला ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्या गुरुदास मोहूर्ले ला मृत घोषित केले. तसेच निकेश गुंडावार व संदीप गुंडावार हे अजूनही सापडले नाही. सदर घटनास्थळी सावली पोलीस आहे. या घटनेने सावली शहरात शोककळा पसरली आहे.
Discussion about this post