संजीव बडोले.
नवेगावबांध दि.२ सप्टेंबर:-
येथील रहिवासी व पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी जिल्हा भंडारा येथे कार्यरत प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांची काल जाहीर झालेल्या २०२२-२३ च्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारा साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात येणार आहे.
सन २०१२ पासून शिक्षक खुशाल डोंगरवार हे शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शाळेत रूजू झाल्यापासून, अभ्यासक्रमाबरोबरच विविध सहशालेय उपक्रम राबविण्यास सुरवात केली. त्याचे फलित आज शाळेची होत असलेली प्रगती आहे. ते शाळेत विविध नवोपक्रम सुद्धा राबवित असतात. त्यांचाही फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. शाळेच्या प्रगतीचा आलेख हा वर जात आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांत शिक्षणाबरोबरच इतरही कौशल्यांचा विकास होण्यास मदत होत आहे.कोरोना काळात प्रत्यक्ष शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. म्हणून विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले होते.त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन ५ सप्टेंबर २०२३ ला शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२२-२३ साठी निवड झाली आहे.
खुशाल डोंगरवार यांच्या निवडीबद्दल रमेश शिक्षण संस्था कुडेगाव ता-लाखांदूरचे सचिव श्री नरेश जयदेवजी मेश्राम, तसेच समस्त पदाधिकारी रमेश शिक्षण संस्था कुडेगाव,जि.प.भंडारा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्री रवींद्रजी सोनटक्के,जि.प.भंडारा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्री संजयजी डोर्लीकर,जि.प.भंडारा माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी श्री रवींद्रजी सलामे, लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी श्री तत्वराजजी अंबादे साहेब,डाएटचे प्राचार्य राजेशजी रुद्रकार, डाएट गडचिरोलीचे अधिव्याख्याता श्री गुलाबरावजी राठोड, केंद्रप्रमुख श्री गजभिये,केंद्रप्रमुख श्री रवींद्र शिवहरकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री भालचंद्र चुटे, सहयोगी शिक्षक श्री गौतम कांबळे,कु अनुराधा रंगारी,शिल्पा मेश्राम, आणि समस्त शिक्षक मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
खुशाल डोंगरवार यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील किसनजी डोंगरवार,धनराजजी डोंगरवार,आई विजू डोंगरवार, पत्नी पल्लवी डोंगरवार, भाऊ संदिप डोंगरवार, माधुरी डोंगरवार,स्वरा आणि परिधी डोंगरवार, समस्त नातलग तसेच सुनिलजी कापगते उपाध्यक्ष शाळा व्यस्थापन समिती तथा समस्त पदधिकारी समस्त पदधिकारी माता पालक संघ, समस्त पदधिकारी पालक शिक्षक संघ, समस्त पदाधिकारी ग्रामपंचायत पिंपळगाव कोहळी, विनोदजी शहारे चंपाबाई बागडे, शेवंताबाई शहारे, समस्त पालकवर्ग आणि पिंपळगाव कोहळी,नवेगावबांध आणि मोहरणा येथील समस्त गावकरी आणि आपल्या कुटुंबियांना दिले आहे.
मला मिळालेल्या या यशात माझे सहकारी शिक्षक,माझे विद्यार्थी, पालकवर्ग,माझे नातलग आणि पिंपळगाव कोहळी,नवेगाव बांध आणि मोहरणा येथील समस्त गावकरी यांची प्रेरणा आणि सहकार्य याचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे हे पुरस्कार हे माझे एकट्याचे नसून आम्हा सर्वांचे आहेत. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य मला वेळोवेळी प्रेरणा देत असतात त्यामुळेच मला इथपर्यंत पोहचता आलं.मी अशाचप्रकारे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समोरही जोमाने कार्य करेन.माझा हा पुरस्कार माझी दिवंगतआई मंदाबाई धनराज डोंगरवार यांच्या स्मृतीस अर्पण.
– खुशाल डोंगरवार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२२-२३ प्राप्त शिक्षक.
Khushal Dongarwar, a resident of Panchsheel Primary School and an experimental teacher working at Pimpalgaon Kohli District Bhandara, announced yesterday the state level revolution Jyoti Savitribai Phule Kranti of 2022-23.
khabarbat News
Post Views: 42
Discussion about this post