Chandrapur’s young singer Zee on Marathi
झी मराठीवर सुरू असलेले नवा रियालिटी शो”जाऊ बाई गावात” ह्या रियालिटी शो मधे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना गावाकडच्या वातावरणात राहण्याचे चॅलेंज देण्यात येत आहे. शहरात अत्यंत ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या काही तरुणींना काही दिवस आता एका खेडे गावात राहून तेथील कामे एका टास्क प्रमाणे करावे लागतात. नवनवीन उपक्रम च्या माध्यमातून गावाकडील जीवन अनुभवण्याचा प्रयत्न असणारा रियालिटी शो _जाऊ बाई गावात_ याचा नुकताच गावकऱ्यांचा बावधन गावातील ऑर्केस्ट्रा प्रसारित झाला त्यात चंद्रपूरचा युवा गायक प्रणय रमेशराव गोमाशे यांचा सहगायक म्हणून सहभाग झळकला आहे.
गायक प्रणय गोमाशे हे मूळचे आपल्या विदर्भातील चंद्रपूर चे असून स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य पदवीउत्तर शिक्षण पूर्ण केले, त्या दरम्यान ते नागपूर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे पुढे संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली,पुढे मुंबई विद्यापीठ संगीत विभाग माजी विद्यापीठ प्रमुख व जयपूर घराण्याचे जेष्ठ गायक पंडित मुरलीमनोहर शुक्ला गुरुजी यांच्या कडे गायकी ची तालीम घेत सुप्रसिद्ध गायक डॉ. सुरेश वाडकर,राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे इ.यांच्या मार्गदर्शन त्यांना लाभले. आणि मुख्य म्हणजे प्रणय ने संगीत विषय घेऊन पदविका पुर्ण केलीय(MA music). विविध राज्य स्तरीय गायन स्पर्धा,जागतिक सांस्कृतिक महोत्सव,विविध राज्यात गायनाचे कार्यक्रम इ.ठिकाणी आपली कला सादर करून विविध सामाजिक संघटना मार्फत देण्यात येणारे “युवा पुरस्काराने” सन्मानीत आहेत. मुंबई येथील प्रसिध्द PRANAY G MUSICIANS AND BAND चे मुख्य गायक आहेत मुंबई च्या व इतर स्थानिक कलाकारांनी मिळून मराठी, हिंदी, वेस्टर्न, संगीताच्या वेगवेगळ्या तर्हा लोकांसमोर नव्याने सादर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
जुण्या गाण्यांच्या संयोजनाला धक्का न लावता आधुनिक वाद्यांचा वापर,त्यांच्या बॅन्ड ला युनिक बनवते, म्हणूनच कमीत कमीम वेळेत जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवणारा हा एकमेव संगीत संच आहे. साध्यावत मुंबई मधील असे कोणतेच व्यासपीठ नाही जिथे PRANAY G बॅंड ने सादरीकरण केले नसेल,संपूर्ण मुंबईतच नवे तर विदर्भातील अनेक शहरात, महाराष्ट्रातील नाशिक,पुणे, देशातील इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांच्या पुढे गाण्याची संधी मिळाली ,गोवा सरकार आयोजित “गोवा महोत्सव” मध्ये सुद्धा यांनी प्रसिद्धी मीळवलीय अश्या अनेक मेट्रो शहरात यांची हॉउसफ़ुल्ल कार्यक्रम आजवर झालेली आहेत.
विदर्भातील आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज सेवा संस्थान शेगाव येथे समाधी मंदिर पुढे भजन सेवा सादर केली असून,
बीड येथील प्रसिद्ध भगवान गढ/ नारायण गढ येथे 2 लक्ष जनसमुदाय पुढे सुप्रसिध्द भजन सम्राट श्री.आदिनाथजी सटले गुरुजी ह्यांना साथ संगत करायची संधी त्यांना मिळाली.
त्याव्यतिरिक्त प्रणय गोमाशे हे मुंबईच्या समाजभारती या त्रैमासिक अंकाचे ते सह-संपादक असून मुंबई मध्ये विदर्भातून येणाऱ्या होतकरू लोकांसाठी ४० वर्षापासून समाजसेवेचं कार्य करणाऱ्या “विदर्भ युवक मंडळ कल्याण” चे ते सह कोषाध्यक्ष,अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ शाखा कल्याण चे सहसंघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत.
चांगल संगीत सर्व सामान्य पर्यंत पोहोचवणे आणि त्या मार्फत समाजात शांती आणि प्रेम निर्माण होईल ह्यासाठी संगीत मध्ये भविष्यात PhD करीत आहेत.संगीताचे विविध वर्ग ते चालवतात शिवाय संगीत ध्यान साधनेच्या माध्यमातून मनःशांती कशी मिळवायची ह्यावर त्यांचे प्रात्यक्षिक सध्या प्रसिध्द आहे.
समाजातील विविध क्षेत्रातील मंडळींनी त्यांच्याशी जुळून आंतरिक शांती ची अनुभूती घेतली आहे.सध्या आँनलाईन/ऑफलाईन संगीत अकादमी च्या माध्यमातून अनेक लोकांनी संगीताचे धडे प्रणय कडून घेतले आहेत. गायक प्रणय स्वतः वारकरी संप्रदायातील असून,
जास्तीत जास्त वारकरी संप्रदायात तरुण मुला-मुलींनी यावं आणि समाजात संतांचे विचार भजन कीर्तनाच्या माध्यमातून अंगीकृत करावे याकरिता महाराष्ट्राभर ते विविध वारकरी उपक्रमांच्या माध्यमातून मोहीम चालवतात.
नुकताच सुप्रसिध्द गायक पद्मश्री शंकर महादेवन संगीत दिग्दर्शित संगीत वेब सीरिज “बंदिश ब्यांडीट 2” मध्ये प्रणय ची निवड झाली असून त्याचे शूटिंग सुद्धा पूर्ण झाले आहे लवकरच मोठ्या पडद्यावर प्रणय च्या संपूर्ण टीम सहित भारतातील सर्वोत्कृष्ट बँड म्हणून ते झळकणार आहेत.
त्याकरिता नेटफलिक्स आणि अँमेझॉन यांनी त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतला आहे. जाऊ बाई गावात या रिऍलिटी शो मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता हार्दिक जोशी हा सूत्रसंचालक म्हणून आहेत तर सुप्रसिद्ध गायक श्री.आनंद जी शिंदे, संगीत दिग्दर्शक “एक पोरगी” फेम श्री.मनोहर गोलंबरे ह्यांच्या प्रणय ने सहगायान केले
असून आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
Discussion about this post