Temporary Recruitment for Nagpur Winter Session
[tta_listen_btn]
नागपूर, दि. 30: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. 7 डिसेंबरपासून विधान भवन नागपूर येथे सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन कालावधीकरिता तात्पुरत्या पुर्णतः हंगामी स्वरूपात लिपीक-टंकलेखकाची एकूण 10 पदे एस-6 (रु. 19900-63200) आणि शिपाई / संदेश वाहकांची 24 पदे एस-1 (रु.15000-47600) या वेतन संरचनेनुसार भरण्यात येणार आहे. (temporary recruitment for work. Nagpur News)
लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक अर्हता 12 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व संगणकाची एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण. वयाची अट खुल्या संवर्गासाठी वय वर्षे 18 ते 38 आणि मागास वर्गासाठी वय वर्षे 18 ते 43 (5 वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम)
शिपाई/ संदेश वाहकासाठी शैक्षणिक अर्हता 4 था वर्ग उत्तीर्ण किंवा उच्च अर्हता. वयाची अट खुला संवर्गासाठी वय वर्षे 18 ते 38 तर मागास वर्गासाठी वय वर्ष 18 ते 43 (5 वर्षे नियमाप्रमाणे शिथीलक्षम) तसेच सायकल चालविता येणे आवश्यक आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे. अर्ज 5 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येतील. फक्त याच कालावधीत अर्ज स्विकारण्यात येतील. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. (temporary recruitment for work. Nagpur News
अर्ज स्वीकारण्याचे स्थान सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र.2, दुसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर 440001 (दूरध्वनी 0712-2531213) येथे स्वीकारल्या जातील. उमेदवारांनी कार्यालयात अर्जाचा नमुना घेण्यासाठी येताना सोबत फोटो तसेच इतर शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. अर्जाचा विहित नमुना सदर कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.
Discussion about this post