चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेत (Chandrapur District Central Cooperative Bank) विविध पदांसाठी 358 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या ३५८ जागांसाठीची चंद्रपूर DCC बँक परीक्षा १५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर (Exam dates announced) दरम्यान तीन दिवस घेतली जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र तीन दिवस आधी https://www.cdccbank.co.in/ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रिया सुरू आहे. बँकेकडून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत लिपिक आणि शिपाई या पदांसाठी एकूण ३५८ जागा भरण्यासाठी ही अधिसूचना काढण्यात आली होती. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९ ऑक्टोबर २०२४ देण्यात आली होती. भरतीचा पुढील टप्पा हा चाचणी परीक्षेचा असणार आहे. त्यासाठी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेत २६१ लिपिक आणि ९७ शिपाई या पदांची ऑनलाईन परिक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करण्यात येत आहे. परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर राबवण्यात येणार आहे. उमेदवारांना अधिक आणि सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ www.cdccbank.co.in ला भेट द्यावी.
Discussion about this post