तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप
नागपूर – तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (RTMNU शी संलग्न स्वायत्त संस्था) येथील मूलभूत विज्ञान आणि मानविकी विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा आज यशस्वी समारोप झाला. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश फ्रंट एंड डेव्हलपमेंटमधील आधुनिक तंत्रज्ञान आणि कोडिंग संदर्भातील मूलभूत कौशल्यांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे श्री. लि. (नेटवर्क संचालक, नागपूर), डॉ. राधारमण शहा (डीन ॲकॅडेमिक्स), डॉ. ममता टाकरखेडे, प्रा. नादिर हुसेन (एचओडी, बीएस अँड एच) आणि प्रथम वर्षाचे प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यशाळेत बूटस्ट्रॅपचा वापर, HTML टॅग्स, CSS टेम्प्लेट्स, व्हिज्युअल स्टुडिओ सेटअप, C व पायथन सारख्या भाषांवर आधारित कोडिंग, तसेच वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. राधारमण शहा यांनी उद्घाटन भाषणात नवउद्योजक अभियंत्यांसाठी तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. नादिर हुसेन यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार डॉ. शहा यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. राधा येटे व प्रा. सायली ठोंबरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. फिजा पठाण यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये GPG चे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड-पाटील, उपाध्यक्ष श्री. आकाश गायकवाड-पाटील, खजिनदार डॉ. संदीप गायकवाड-पाटील, प्राचार्य डॉ. पी. एल. नाकतोडे, डॉ. प्रगती पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच डीन आयक्यूएसी डॉ. रीफ्रंपूरकर व डॉ. राधारमण शहा यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यशाळा अधिक परिणामकारक झाली.
कार्यशाळा पूर्णपणे शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल अशा पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडली.
Discussion about this post