स्कॉलर सर्चअकॅडमी ज्यूनिअर कॉलेज इथे करियर गायडन्स मेळावा
कोरपना: सर्च फाउंडेशन संचालित, स्कॉलर सर्च अकॅडमी ज्युनिअर कॉलेज, कोरपना येथे दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नागपूरचे श्री रोशन पांडे यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले.
श्री पांडे यांनी NEET, IIT-JEE, MHCET आणि CUET या परीक्षांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. या परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षा कधी असते आणि या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो याविषयी त्यांनी विस्तारपूर्वक माहिती दिली.
याप्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाचे संचालक श्री हरिश्चंद्र थिपे, शाळेचे प्राचार्य श्री राहुल उलमाले, उपप्राचार्य ज्योत्स्ना दहागावकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे संस्थापक श्री इंजीनियर दिलीप झाडे आणि सौ कुंदा झाडे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या समोरील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा करिअर गायडन्स कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात माहिती मिळवून आपल्या करिअर निवडीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी मदत मिळवली.
एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर. किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारा यश म्हणजे त्याचे करिअर असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे. हेच करिअर मार्गदर्शन देण्याकरिता नागपूरचे श्री रोशन पांडे हे मार्गदर्शक म्हणून आले होते.
Discussion about this post