नागपूर: TGPCET इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. प्रेमानंद नाकतोडे यांच्या उपस्थितीत डॉ. विजय भटकर हॉलमध्ये “इनव्हिक्टस” फोरमची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री देवीशंकर मिश्रा, टेक्निकल लीड, टेक मेंटर यांच्या हस्ते करण्यात आले, डॉ संजय एम आसुटकर यांनी प्रास्ताविक भास्य केले, ह्या प्रसँगी डॉ भारती सायनकर, डॉ प्रवीण ताजणे, रोहिणी पोची, राहुल धुतुरे, संदीप ठाकरे, कुशल मसारकर, सूरज महाजन, अमोल ढेंगे, मयुरी हरडे, पल्लवी रोकडे, मंच समन्वयक कल्याणी सावरकर, श्रुतिका वानखेडे उपस्थित होते.
श्री. देवीशंकर मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, डेटा सायन्सशी संबंधित अलीकडील तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले आणि सिद्धांताच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना एकाच वेळी व्यावहारिक प्रदर्शनावर भर दिला. उद्योगाच्या मागणीशी संबंधित रोजगारक्षमता कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, चषक आणि पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. एनपीटीईएल सिल्व्हर मिळवणाऱ्या एका विद्यार्थ्याचा आणि एनपीटीईएल एलिटमध्ये गुण मिळवणाऱ्या ४ विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या मंच इनव्हिक्टसच्या निवडलेल्या मंडळाला बॅजसह शपथ देण्यात आली.
ईसीई विभागानी माननीय अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड पाटील सर, श्री. आकाश गायकवाड पाटील सर, डॉ. संदीप गायकवाड पाटील सर, डॉ. गीता गायकवाड पाटील मॅडम, श्री. विनोद गायकवाड पाटील सर, डॉ. जी के आवारी सर, प्राचार्य डॉ. पी. एल. नाकतोडे सर, उपप्राचार्य डॉ. प्रगती पाटील मैडम, डॉ. अमेय खेडीकर, डॉ. अनुप गाडे, प्रा. रितेश बनपूरकर आणि वरिष्ठ अधिकारी यांचेआभार मानले.
डॉ संजय आसुटकर यांनी आभार प्रदर्शन केले. सानिका कांबले, ट्विंकल करपे, मो. कैफ, रोहित बरबटे,अथर्व चिटनिस यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व साईराज, चंदन शेंडे, आणि प्रांजल टाले यांनी कार्य केले.
Discussion about this post