चंद्रपूर | महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, नागपूर विभागाची सहविचार सभा आज दिनांक १८ जून २०२५ रोजी चंद्रपूर येथील विश्वकर्मा सभागृहात उत्साहात पार पडली. (Nagpur Divisional Co-Deliberation Meeting of Maharashtra State Aided Superintendents’ Association held at Chandrapur)
या सभेला नागपूर विभागातील वर्धा, भंडारा, गोंदिया (देवरी), चिमूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथून अधीक्षक/अधीक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री ताडाम सर होते. प्रारंभी प्रास्ताविक काळे सर यांनी केले. यावेळी संघटनेच्या सदस्यत्व फी जमा करण्याचा विषय, 10/20/30 वर्षांच्या सेवेनंतर लागू असलेल्या प्रगती योजनांची अंमलबजावणी, कामाचे निश्चित तास व सहाय्यक अधीक्षक/अधीक्षिका यांच्या पदाची गरज या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री बरडे, श्री चाफले, श्री सरादे, श्री गंधारे, श्री मुरकुटे , श्री मारकवार, सौ. धार्मिक , सौ. इंगोले , सौ. गावंडे , सौ. पल्लवी मांडवकर , सौ. उंदीरवाडे मॅडम यांचे उपस्थितीत ज्वलंत प्रश्नांवर मार्गदर्शन झाले.
अनेक अधीक्षक/अधीक्षिका यांनी आपल्या शालेय व प्रशासनातील अडचणी शेअर केल्या. या पार्श्वभूमीवर अध्यक्षीय भाषणातून श्री ताडाम सर यांनी संघटनेच्या माध्यमातून समस्यांवर उपाय कसे मिळवता येतील याबाबत समाधानकारक मार्गदर्शन दिले. सभेच्या शेवटी श्री मारकवार यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी जेवणाचा आस्वाद घेत सभेची सांगता झाली.
Top search queries for your site | Clicks | Impressions |
---|---|---|
0
|
1
|
|
0
|
1
|
|
0
|
4
|
|
0
|
1
|
|
0
|
15
|
|
0
|
2
|
|
0
|
1
|
|
0
|
1
|
|
0
|
1
|
|
Discussion about this post