स्कॉलर्स सर्च अकॅडेमी आणि ज्युनिअर कॉलेज, कोरपना येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

कोरपणा :- सर्च फाउंडेशन संचलित स्कॉलर्स सर्च अकॅडेमी आणि ज्युनियर कॉलेज कोरपना येथे संविधान दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती कोरपना तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले . त्याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा श्री अभिषेक पाटील साहेब (दिवाणी न्यायाधीश कोरपणा) यांची उपस्थिती होती. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळ यासंबंधीचे कायदेशीर जागरुकता यांचे सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले ,मा श्री सचिन कुमार मालवी (गटशिक्षण अधिकारी कोरपणा ) यांनी संविधानाविषयी असलेले प्रत्येक नागरिकाचे महत्त्व याविषयीची कल्पकता स्पष्ट केली,मा श्री कल्याण जोगदंड (विस्तार अधिकारी शिक्षण कोरपना) , आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री बालाजी पेद्देवाड(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा ) यांनी विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेला अधिकार,हक्क, कायदे व शिक्षणाप्रतीची प्रेरणा यांचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांना दर्शविले,मा श्री तेजस कामतवार (केंद्रप्रमुख केंद्र कोरपणा )तसेच स्कॉलर्स सर्च अकॅडमी व जुनियर कॉलेजचे प्राचार्य श्री राहुल उलमाले यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिवस व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर लेक्चरर प्रणाली खडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्युनिअर लेक्चरर करिष्मा साठवणे यांनी केले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग या कायदेशीर मार्गदर्शन शिबिर मध्ये उपस्थित झाला होता.

Discussion about this post