चंद्रपूर: येथील शिक्षक तथा समाजसेवी हरीश ससनकर यांनी 1 फेब्रुवारी रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथील रक्तपेढीत रक्तदान करत 100 व्या रक्तदानाचा विक्रम गाठला.
हरीश ससनकर हे नियमित रक्तदाते असून, ते स्वतःच्या तसेच मुलाच्या वाढदिवसानिमित्त आणि विविध प्रसंगी रक्तदान करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक रक्तदान शिबिरे आयोजित केली असून, त्यांच्या माध्यमातून अनेक नव्या रक्तदात्यांची प्रेरणा मिळाली आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावे, असे ते आवाहन करतात.
विशेष म्हणजे, त्यांचा मुलगा जैमिनी ससनकर यानेही 18 व्या वर्षांपासून नियमित रक्तदान करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. “एकाचे रक्तदान, अनेकांचे जीवनदान” या उक्तीनुसार त्यांनी आजवर अनेकांचे प्राण वाचवले आहेत. रक्तदान हे समाधान मिळवून देणारे श्रेष्ठ दान आहे, असे त्यांचे मत आहे.
या 100 व्या रक्तदानाच्या सोहळ्यात त्यांच्या सोबत मित्र दत्तू क्षीरसागर यांनीही स्वेच्छेने रक्तदान केले. यावेळी डी.के. आरिकर, ईश्वर मेंढुलकर, वैशाली ससनकर यांची विशेष उपस्थिती होती.
Discussion about this post