कामठी तालुक्यातील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था मार्फत आयोजित कार्यक्रमात ‘विकसित महाराष्ट्रात तरुणांना रोजगार संधी’ या विषयावर बोलताना झुंजार व्यक्तिमत्व माजी खासदार पूनमताई प्रमोद महाजन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वरील कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष श्री पुष्पराज मेश्राम सर तसेच सचिव श्री सुनील चव्हाण यांच्या संस्थेअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला, वरील कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोककुमारजी भाटिया, डायरेक्टर डेवलपमेंट, शिक्षण प्रसारक मंडळ कामठी, तसेच पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनयजी चव्हाण उपस्थित होते तसेच कमलेशजी भागवतकर व ईश्वरजी रेवनशेटे यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शविली वरील कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर विनोद शेंडे सर यांनी केले तसेच प्रास्ताविक डॉक्टर तुषार चौधरी सर यांनी केले तसेच पूनमताई महाजन यांचा परिचय प्राध्यापक पुष्पराज मेश्राम सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. मंजिरीताई नागमोते मॅडम यांनी केले वरील कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. वरील कार्यक्रमात कामठी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर विवेकजी चंदनानी तसेच डॉक्टर महेश महाजन, डॉक्टर प्रीतीताई मानमोडे, डॉक्टर विनोद दाढे, डॉक्टर मनीषा राजगिरे, प्रामुख्याने उपस्थित होते आणि सुरेशजी भंन्नारे सर शिक्षक आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. एडवोकेट विलास जांगडे, रंजनाताई कश्यप, संगीताताई अग्रवाल तसेच शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post