नवेगावबांधच्या आशय डोंगरवारची बंगळूरच्या आयआयएससी इंटर्नशिपसाठी निवड.
ठरला नवेगावबांधचा शैक्षणिक मानदंड.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१२ एप्रिल.
येथील प्रभाग क्रमांक दोन मधील रहिवासी आशय पुनेश्वर डोंगरवार याची देशातील सर्वोच्च संशोधन संस्था भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी)बंगळुरू येथे एक महिन्याच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील केवळ पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे,त्यातआशयचा समावेश आहे.हे येथे उल्लेखनीय आहे.
आशयची निवड ही नवेगावबांध तसेच संपूर्ण गोंदिया जिल्ह्या बरोबरच, विदर्भासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
सध्या आशय हा चंद्रपूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय तळोधी (बाळापूर) येथे शिक्षण घेत आहे.
नवेगावबांधचे मूळ रहिवासी असलेले आशयचे वडील पुनेश्वर डोंगरवार आणि आई उषा हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
घरातून मिळालेल्या शैक्षणिक वारसा पासून प्रेरणा घेऊन, आशयने अभ्यास, वैज्ञानिक उपक्रमांमधील सहभाग,तसेच मुलाखतीत उत्कृष्ट कामगिरी करून,ही मानाची गौरवपूर्ण निवड मिळवली आहे.
२९ एप्रिल ते २८ मे २०२५ या कालावधीत आशय भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू येथे आपली इंटर्नशिप(आंतरवासिता)पूर्ण करणार आहे.या इंटर्नशिपच्या माध्यमातून त्याला इस्रो च्या प्रयोगशाळेला भेट, तसेच देशातील नामवंत शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद करण्याची संधी आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
ही संधी केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून,आशयसारख्या होतकरू विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे. आशयच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्याबरोबरच चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक पातळीला नवीन उंची मिळाली आहे.
नवोदय विद्यालयाचे प्राचार्या मीना मनी,
शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्याचे पालक, आणि नवेगावबांध ग्रामस्थांनी त्याच्या यशाबद्दल आशयचे भरभरून कौतुक केले आहे.
Discussion about this post