राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपक्रम
संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले स्वच्छता अभियान व कार्यकर्ता मेळावा आज दि.२३ फेब्रुवारी रोज रविवारला किल्ले प्रतापगड पायथा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. शिवस्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमास अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजि. राजकुमार बडोले यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवरायांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी,असे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छता अभियानादरम्यान गड परिसरातील प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करून,स्वच्छ भारत संकल्प पूर्ण करण्यात आला.या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, तालुकाध्यक्ष राकापा अर्जुनीमोर लोकपाल गहाणे, ओबीसी सेल अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा उपाध्यक्ष युवक दानेश साखरे, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अध्यक्ष मंजुषा बारसागडे ,योगेश नाकाडे , राजेंद्र जांभुळकर,, विद्यार्थी तालुकाध्यक्ष विद्यार्थी सेल निपल बरैया, नामदेव डोंगरवार, हर्षा राऊत, पंचायत समिती सदस्य पुष्पलता द्रुगकर, किशोर येरणे, प्रेम नागपुरे, योगराज हलमारे , रतिरामजी राणे, यादोराव आगासे, यशवंत शहारे, गजानन कोवे, संजय ईश्वार, दीनदयाल जी डोंगरवार, अजय शहरे, तुलसीदास कोडापे, सौ.चेतना भावेश कांबळे, महेंद्र रहेले,व पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी भविष्यातही असे स्वच्छता उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Discussion about this post