An opportunity to build a career for the youth of Vidarbha in Namo Maharojgar Mela
नमो महारोजगार मेळाव्यासाठी जय्यत तयारी
– मेळावास्थळी अनोखा डोम आणि व्यासपीठ
– बाहेरून येणाऱ्या उमेदवारासाठी विशेष बसगाड्यांची व्यवस्था
बाहेरून येणाऱ्या उमेदवारासाठी गणेशपेठ, मोरभवन, इतवारी, अजनी, बर्डी मेट्रो स्टेशन येथे विशेष बस गाड्याची व्यवस्था राहणार आहे.
नागपूर, दि. ०७ डिसेंबर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे ९ आणि १० डिसेंबर रोजी नागपूर येथे “नमो महारोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, अमरावती रोड येथे जय्यत तयारी करण्यात आली असून, भव्य असा अनोखा डोम आणि व्यासपीठ उभारण्यात आला आहे. यात ५ हजार उमेदवार बसू शकतील इतकी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूरसह विदर्भातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागपुरात दोन दिवसीय “नमो महारोजगार मेळावा” होत आहे. उद्धघाटन सोहळ्यासाठी भव्य मंच, माहिती व सुविधा केंद्र, ऑनस्पॉट नोंदणीसाठी कक्ष, मुलाखतीसाठी स्वतंत्र कक्ष व्यवस्था, देशभरातून आलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी कक्ष, माध्यम प्रतिनिधींची मीडिया कक्ष अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डोम क्रमांक दोनमध्ये मुलाखत कक्ष, डोम क्रमांक तीनमध्ये कौशल्य विकास विभागाचे दालन, बजाज हॉल येथे मुलाखत कक्ष राहणार आहेत. या शिवाय उदघाटन सोहळा झाल्यानंतर मुख्य डोममध्ये देखील मुलाखती आणि कार्यशाळा, मार्गदर्शन सत्र होतील.
मेळावास्थळी एकूण ५० नोंदणी स्टॉल राहणार असून, २५ नवीन नोंदणी आणि २५ ऑनलाईन नोंदणीच्या उमेदवारासाठी असतील. नोंदणीकृत उमेदवारासाठी नाश्ता आणि जेवण कुपन देण्यात येईल. संपूर्ण परिसरात सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यात स्थानिक, राज्यस्तरीय आणि देशभरातील मल्टीनॅशनल कंपन्यांनी एकूण २६ हजारपेक्षा अधिक नोकरीची रिक्वायरमेंट नोंदविली आहे. मुलाखतीअंती सुमारे १० हजार तरुणांना जॉब ऑफर लेटर देण्यात येईल. आतापर्यंत ५० हजाराच्या आसपास उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
Hindi | नमो महारोजगार मेले की तैयारी अंतिम चरण में
– आयोजन स्थल पर अनोखा मंच
– उम्मीदवारों के लिए विशेष बसों की व्यवस्था
नागपुर, 07 दिसंबर: उपमुख्यमंत्री देवेन्द्र फड़नवीस की पहल पर, महाराष्ट्र सरकार के कौशल, रोजगार, उद्यमिता और नवाचार विभाग ने 9 और 10 दिसंबर को नागपुर में “नमो महारोजगार मेले” का आयोजन किया है। जमनालाल बजाज प्रशासनिक भवन, अमरावती रोड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वविद्यालय, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन परिसर में रोजगार मेले की तैयारी अंतिम मोड़ पर है। यहाँ बनाये गए डोम में कार्यक्रम हेतु भव्य मंच एवं अन्य सुविधाएं बनायीं गयी है। जिसमें क़रीब 5000 उम्मीदवारों की बैठक व्यवस्था है।
नागपुर सहित विदर्भ में युवाओं को रोजगार के अवसर प्रदान करने के लिए नागपुर में दो दिवसीय “नमो महारोजगार मेला” आयोजित किया जा रहा है। उद्घाटन समारोह के लिए सभी आवश्यक सुविधाएं प्रदान की जा रही हैं, जैसे कि भव्य मंच, सूचना एवं सुविधा केंद्र, ऑन-स्पॉट पंजीकरण के लिए कक्ष, मुलाकात के लिए अलग कक्ष की व्यवस्था, देश भर से आए कंपनियों के प्रतिनिधियों और अधिकारियों के लिए कक्ष, मीडिया प्रतिनिधियों के लिए मीडिया कक्ष है। डोम नंबर दो में साक्षात्कार कक्ष, डोम नंबर तीन में कौशल विकास विभाग का दालन, बजाज हॉल में मुलाकात कक्ष रहेगा। इसके अलावा, उद्घाटन समारोह के बाद भव्य डोम में कार्यशालाएं, परामर्श सत्र भी आयोजित किए जाएंगे।
आयोजन स्थल पर कुल 50 पंजीकरण स्टॉल होंगे, जिसमे 25 नए पंजीकरण के लिए और 25 ऑनलाइन पंजीकरण उम्मीदवारों के लिए होंगे। पंजीकृत उम्मीदवारों को नाश्ता और भोजन के कूपन दिए जाएंगे। पूरे क्षेत्र में सुरक्षा और पारदर्शिता के लिए सीसीटीवी कैमरों की व्यवस्था की गई है। शहर में मेले में सम्मिलित होने बाहर से आने वाले उम्मीदवारों के लिए गणेशपेठ, मोरभवन, इतवारी, अजनी, सीताबर्डी मेट्रो स्टेशन आदि प्रमुख स्थानों पर विशेष बसेस की व्यवस्था की जाएगी।
स्थानीय, राज्य तथा राष्ट्रिय तथा बहुराष्ट्रीय कंपनियों द्वारा इस रोजगार मेले में कुल 26 हजार से अधिक रोजगार के अवसर प्रदान किये जायेंगे। इंटरव्यू के बाद करीब 10 हजार युवाओं को जॉब ऑफर लेटर दिया जाएगा। अब तक करीब 50 हजार उम्मीदवार ऑनलाइन रजिस्ट्रेशन कर चुके हैं। कौशल, रोजगार, उद्यमिता और नवाचार विभाग ने आयोजन की सफलता के लिए लगभग सभी तैयारियां पूरी कर ली हैं।
English | Preparations in the final stage for Namo Maharojgar Fair
– Special buses to be ferried for the candidates
Nagpur, December 07: On the initiative of Deputy Chief Minister Devendra Fadnavis, the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation, Government of Maharashtra has organized “NaMo MahaRojgar Mela” in Nagpur on December 9 and 10. Preparations for the employment fair are in the final stages at Jamnalal Bajaj Administrative Building, Amravati Road, Rashtrasant Tukdoji Maharaj University, Jamnalal Bajaj Administrative Building Complex. A grand stage and other facilities have been made for the program in the dome built here. In which there is a meeting arrangement for about 5000 candidates.
A two-day “NaMo MahaRojgar Mela” is being organized in Nagpur to provide employment opportunities to the youth in Vidarbha including Nagpur. All necessary facilities are being provided for the inauguration ceremony, such as a grand stage, information and facilitation centre, room for on-spot registration, provision of separate meeting rooms for representatives and officials of companies from all over the country. The room is a media room for media representatives. There will be an interview room in dome number two, the corridor of the skill development department in dome number three, and a meeting room in Bajaj Hall. Apart from this, workshops, counseling sessions will also be organized in the Grand Dome after the inauguration ceremony.
There will be a total of 50 registration stalls at the venue, including 25 for new registrations and 25 for already registered candidates. Breakfast and meal coupons will be given to the registered candidates. CCTV cameras have been arranged in the entire area for security and transparency. Special buses will be arranged at major places like Ganeshpeth, Morbhavan, Itwari, Ajni, Sitabuldi metro station etc. for the candidates coming from outside to attend the fair in the city.
A total of more than 26 thousand employment opportunities will be provided in this employment fair by local, state, national and multinational companies. After the interview, job offer letters will be given to about 10 thousand youth. Till now about 50 thousand candidates have registered online. The State department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation has completed almost all preparations for the success of the event.
*नमो महारोजगार मेळाव्यात विदर्भातील युवकांना करिअर घडवण्याची संधी*
*- ३८ हजार ८०० तरुणांनी केली ऑनलाइन नोंदणी* (Namo Maharojgar Melava Nagpur Registration)
नागपूर, 6 डिसेंबर 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या मार्फत येत्या दिनांक 9 आणि 10 डिसेंबरला जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे भव्य असा नमो महारोजगार मेळावा आयोजित आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नागपूरसह विदर्भातील ३८ हजार ८०० तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नागपूरसह विदर्भातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑनस्पॉट नोंदणीसाठी ५० हून अधिक स्टॉल राहणार आहेत.
या मेळाव्यात कुशल – अकुशल आणि अर्धकुशल तांत्रिक / अतांत्रिक क्षेत्रातील व प्रोफेशनल रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे. तसेच किमान 10, 12 वी पास – नापास तसेच पदविका, पदवी – पदव्युत्तर धारकांना देखील संधी उपलब्ध करून देण्यात येईल या मेळाव्यात देशभरातील नामांकित 300 हून अधिक कंपन्या येथे रोजगार देण्याच्या दृष्टीने उपस्थित राहणार आहेत. यात फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तरी या मेळाव्यात सहभागी होऊन विदर्भातील युवक-युवतींनी आपले करिअर घडवण्याची संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post