सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती, राज्यपालांची मंजुरी
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे खात्यांचे वाटप करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी पाठवलेल्या पत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला.

श्रीमती पवार यांनी आज सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या निर्णयानुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ ही तीन महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनुसार राज्यपालांनी या प्रस्तावाला औपचारिक मान्यता दिली आहे.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पाठवलेल्या पत्रात संबंधित खात्यांचे वाटप मंजूर करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या खात्यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक विकास, युवकांसाठी योजना तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील निर्णय प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपविल्याने राज्य मंत्रिमंडळातील कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे.












Discussion about this post