पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानतर्फे श्री शंकरराव जाधव यांचा ९१ वा जन्मदिवस साजरा
सौदामिनी कलाकारांचा सत्कार
नागपूर, १६ डिसेंबर २०२४ : पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने प्रतिष्ठानचे हितचिंतक श्री शंकरराव जाधव यांचा ९१ वा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी संध्याकाळी बाबुराव धनवटे सभागृह, शंकर नगर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून डॉ. मनोजजी तत्वादी (परिक्षक – एशिया बुक ऑफ रेकॉर्ड) उपस्थित होते. तसेच शुभांगी भडभडे (अध्यक्ष – पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान), प्रभा देऊस्कर (दिग्दर्शिका – स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी) आणि मेघना साने (पत्रकार व नाट्यकलावंत) यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी या यशस्वी नाट्यकलाकृतीतील कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. या नाटकाने स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला सन्मान देत रसिकांच्या मनावर अधोरेखित ठसा उमटवला आहे.
यावेळी श्री शंकरराव जाधव यांना गुलाब पुष्पांचा वर्षाव करून अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून त्यांचा यथोचित सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले, आणि उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी वातावरण भारावून गेले.
Discussion about this post