भाजपचे नाराज नेते सुधीर मुनगंटीवार वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपमध्ये नाराजगीच्या लाटेचा जोर आहे. यात भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव मुख्यतः घेतलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
BJP’s Disgruntled Leader Sudhir Mungantiwar Meets Union Minister Nitin Gadkari
आज, सुधीर मुनगंटीवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. गेल्या एक तासापासून दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे ते नाराज आहेत, असा अंदाज आहे. नागपूरात असूनही ते विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या नाराजगीला आणखी बळ मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले, “सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे. पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. सुधीर मुनगंटीवार हे अनुभवी नेते आहेत, त्यामुळे पक्षाने त्यांना मंत्रिमंडळात का घेतले नाही, हे विचार करण्यासारखं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर मोठी जबाबदारी मिळेल
आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
मंत्रीपद दिले नाही म्हणून मी नाराज नाही
मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने मी नाराज नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
“मंत्री असताना मी मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत माझे मत मांडले. आता आमदार म्हणून मी माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी माझे मत मांडत राहीन. छोटं-मोठं पद असे काही नसते. मी संघटना आणि भाजपवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने जे काम सांगितले, ती जबाबदारी मी नेहमीच पूर्ण केली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास ते सदैव तयार आहेत. “माझ्यासाठी मंत्रीपद किंवा इतर कोणतेही पद गौण आहे, पक्षासाठी काम करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
BYTE: सुधीर मुनगंटीवार, आमदार
BJP’s Disgruntled Leader Sudhir Mungantiwar Meets Union Minister Nitin Gadkari
Mumbai: After the cabinet expansion, there is a wave of dissatisfaction within the BJP. Senior BJP leader and former minister Sudhir Mungantiwar is one of the leaders who is reportedly upset. There are discussions that Sudhir Mungantiwar is upset due to not being included in the cabinet expansion. Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has now commented on Mungantiwar’s discontent.
Sudhir Mungantiwar has reached Union Minister Nitin Gadkari’s residence for a meeting. The two have been in discussion for the past hour, according to reports. Mungantiwar’s displeasure is reportedly due to not being given a position in the cabinet expansion. Despite being in Nagpur, he did not attend the legislative session, which has fueled further speculation about his dissatisfaction.
Chief Minister Devendra Fadnavis clarified, “Sudhir Bhau is our senior leader, and I have spoken with him. The party has decided to assign him a special responsibility. Sudhir Mungantiwar is an experienced leader, and it is something the party will think about as to why he was not included in the cabinet,” he stated.
Discussion about this post