चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले हे 27 मार्च रोजी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
सकाळी साडेदहा वाजता पटेल हायस्कूल जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य अशा रॅलीच्या द्वारे गांधी चौकातून आंबेडकर चौक ते जटपुर गेट येथून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य रॅली निघणार आहे. त्यानंतर ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते, ओबीसी समाजाचे नेते, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
राज्यात वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी यांच्यातील चर्चित जागावाटप फार्मूला फसल्याचे चित्र पुढे आले आहे. चंद्रपुरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांना एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेली समाजातील महत्त्वाचे नेते असलेल्या राजेश बेले यांनी आपल्या समर्थकांसह आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले आहे. जनतेने मतरुपी आशीर्वाद देत वंचित बहुजन आघाडीचा रथ विजयाकडे न्यावा असे आवाहन बेले यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज दुपारी आपली भूमिका स्पष्ट करण्याची चिन्हे असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पूर्व विदर्भातील आपल्या कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याचे निर्देश दिल्याने त्यांनी महाविकास आघाडीशी काडीमोड घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
Discussion about this post