निसर्गाने निर्माण केलेल्या जगात प्रवास असतोच मग तो प्रवास आपण कुठल्या ठिकाणी फिरण्यास गेले असतानाचा प्रवास असो किंवा आपल्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचा असो, पण त्या जीवनाच्या सीमारेषेमध्ये भरपूर काही आपल्याला नवनवीन शिकायला मिळते त्याचसोबत हा प्रवास उधळत्या रंगांसारखा रंगीबेरंगी व फुलांसारखा आनंददायी असतो. आणि हा प्रवास आणखी सुखकर व सोईस्कर होतो तो म्हणजे या आपल्या अवतीभोवती असलेल्या सुंदर निसर्गामुळे.
मित्रमैत्रिणींसोबत निसर्गाचा आनंद घेणं आणि नवीन ठिकाणं पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. या लेखात मी माझ्या रामटेकला झालेल्या शालेय सहलीचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
तर अशाच प्रवासावर आपण जाणार आहेत. सर्वप्रथम मी माझ्या शालेय सहलीविषयी सांगेल, ते थंडीचे दिवस होते फेब्रुवारी मध्ये, आणि त्यातच आमची शैक्षणिक सहल रामटेक येथे जाणार होती. आणि तो माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस होता. त्याचे कारण जरी वेगळे असले तरी आपण प्रवासावर लक्ष केंद्रित करुया. सगळी पॅकिंग झाली. माझ्या मम्मीने मला छान टीफिन, स्नॅक्स आणि इतर वस्तू बॅग मध्ये पॅक करून दिल्या आणि बाबांनी शाळेत सोडून दिलं. बसेस समोर नुकतचं नारळ फोडणं चालू होतं. आणि मी पप्पांसोबत बोलून मैत्रिणीकडे गेले. पप्पा बस जाईपर्यंत थांबले होते. आमच्या पिकनिकला जाण्याच्या गोष्टी आपापसात मैत्रिणींमध्ये चालू होत्या. आमचा इकडे धिंगाणा चालू होता आणि तिकडे शिक्षक आम्हाला ओरडत होते. पण आम्ही आपल्या धुंदीत मग्न होतो. थोड्याच वेळात बसेस निघण्याची वेळ झाली. सगळ्यांची किलकिलाट चालू होती. मी पप्पांना by केलं आणि बसमध्ये चढली. आमच्या ग्रुपच्या सगळी मंडळी बसच्या मागच्या सीट वर बसलोत व खूप सारी मस्ती करत रामटेक गाठले. बस मध्ये इतकी मौज – मस्ती झाली की, कळलंच नाही केव्हा रामटेक पोहोचलो.
रामटेक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपुर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर नागपुरच्या इशान्येस सुमारे ५४ कि.मी. अंतरावर आहे. रामटेकमध्ये हवामान ऋतूनुसार बदलत राहाते.
सगळ्या विद्यार्थ्यांना रामटेकचे प्रसिध्य गडमंदीर दाखविण्यात आले. तिथे पुर्वेला उंच डोंगर आहे व त्यावर सुमारे ६०० वर्षे जुने मंदीर आहे. तिथुन आजुबाजुचे अतिशय सुंदर दृष्य दिसतात. मंदीराच्या परिसरात विशाल नंदी आहे. व गणेशाचे पुराने मंदिर आहे. तिथे वानरसेना खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी एका बंदराला तिथे चने खायला दिले होते आणि त्याने शांतपने खाले होते. त्यातच माझ्या मैत्रिणीच्या हातातले बोरं दुसऱ्या बंदराने हिसकावले होते. तिथे बाहेर देशातले पर्यटक सुध्दा फिरण्यासाठी येतात. या मंदिरात त्रिपुरी पोर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो. जवळच तोतलाडोह हे धरण आहे. रामटेक मध्ये छोटी बरीच तलाव आहेत. रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटकालीन नगरधनचा किल्ला त्याची राजधानी होता.
रामटेक परिसरात नुकताच पुरातन बौध्द संस्कृतीचा शोध लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालु आहे. मनसर येथे पुरातन कालीन महाविहार होता. असे उत्खननात आढळून आले. ही आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांची कर्मभुमी असल्याचे सांगतात. रामटेकच्या आजुबाजुच्या परिसरात प्रेक्षनीय स्थळे, खींडसी तलाव, नगरधनचा किल्ला, महानुभाव पंथाचे मंदिर, आंबाडा तलाव, मनसर जैन मंदीर दत्यादी ठिकाणे प्रसिध्द आहेत.
आम्ही रामटेकला गेले असताना एक प्रसंग तुम्हाला सांगते, सगळे विद्यार्थी मौज-मस्ती करत होते. अचानक माझं लक्ष एका आंधळ्या व्यक्तीकडे गेलं आणि ती व्यक्ती रस्ता ओलांडत होते. आणि त्याच्या बाजुला काही स्त्रीया देखील रस्ता ओलांडत होत्या. पण तरीही त्यांनी त्या माणासाचा हात पकडून रस्ता ओलांडण्यात मदत केली नाही. मला ते चुकीचं वाटलं आणि मी धावत शिक्षकांना न सांगता त्या इसमा जवळ गेली व त्याला रस्ता ओलांडण्यास मदत केली. त्यांनी माझे नाव विचारले, मी सागितले ‘प्राजक्ता’ ते व्यक्ती मला आभार व्यक्त करत, मला आर्शिवाद दिले. मला मनापासून बरं वाटलं आपण मदत केल्याचं, जेव्हा आपण कोणाची मदत करतो तो आनंद वेगळाच असतो. पण पुढे मला Teacher च्या दोन गोष्टी ऐकाच्या होत्या. कारण मी न सांगता गेले होते, परंतु मनात आनंद पन तेवढाच होता. आणि मग खरं जानून घेतल्यावर Teacher सुध्या जास्त काही बोलले नाहीत. ते काहीही असो पण तो दिवस फार लक्षात राहण्यासारखा ठरला होता. परतीच्यावेळी आम्हाला रामटेक मध्ये स्थित रामधाम व नगरधनचा किल्ला दाखविण्यात आला. नगरधन भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपुर जिल्ह्यात रामटेकपासुन वायव्येस सुमारे ७ कि. मी. अंतरावर असलेला हा ‘भुईकोट’ प्रकारातील एक किल्ला आहे.
नगरधनचा भुईकोट हा प्रथमदर्शनी आपल्याला मोहवून टाकतो. नगरधन किल्ल्याने कात टाकून नवे रूप धारण केले आहे. याची तटबंदी व आतील भाग नव्याने दुरुस्त केलेला आहे. लालसर पण काळ्या रंगाची झाक असलेल्या चिऱ्यांनी किल्ल्याची तटबंदी व दरवाजा बांधुन काढल्यामुळे त्याचे सौंदर्य कैकपटीने वाढलेले आहे.
पुढे सांज झाली आणि आम्हाला शाळेकडे परतण्याची वेळ झाली. दिवसभर मस्ती करून थकल्यामुळे हीरव्या वातावरणातुन येताना थंडी वार्याची झुळुक गालावर आली. आणि आम्ही झोपी गेलो. थोड्या वेळाने उठलो आणि तीच मस्ती व गोंगाट करत शाळेत परतलो. कधी शाळेत पोहोचलो कळलेचं नाही. मग सगळ्यांचे Parents विद्यार्थ्यांना घ्यायला आले होते. माझे आई-बाबा मला घ्यायला आले होते. मग पुर्ण दिवसभर केलेली मस्ती, आणि फिरलेली ठिकाणे, तिथे काढलेले फोटो, तिथे घडलेले सर्व प्रकार आई-बाबांना सागत-सागत घरी आले.
अशाप्रकारे माझ्या आयुष्यातील अनुभवलेली माझी पहिली शालेय सहल होती. आणि कायम लक्षात राहणारा प्रवास. तो दिवस नेहेमी आठवणीत राहण्या सारखा ठरला.
– प्राजक्ता पाटील
Discussion about this post