*सहा महिलांना कर्ज; निर्मल अर्बन बँकेचा पुढाकार*
नागपूर, दि. १५ डिसेंबर २०२३: नागपूरस्थित निर्मल अर्बन को-ऑप बँक, नंदनवन शाखेच्या वतीने खास महिलांसाठी संयुक्त दायित्व गट योजने अंतर्गत सहा महिलांना प्रत्येकी ५० हजार प्रमाणे ३ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. या योजनेचे उद्दिष्ट महिलांच्या आर्थिक उत्थानास चालना देणे हे आहे.
रिझर्व्ह बँकेने १६ जुलै २०२३ च्या परिपत्रकाप्रमाणे आव्हान केल्यानुसार बँकेच्या संचालक मंडळाने ४.१२.२०२३ चा सभेमध्ये संयुक्त दायित्व गट योजने अंतर्गत कर्जवितरण करण्याचे ठरविले होते. या योजनेअंतर्गत घरगुती गरजा, गृह उद्योगाला चालना देऊन महिलांचा त्यांचे कुटुंबात आर्थिक वाटा उचलनेकरिता कर्ज वाटप केले जाते.
या प्रसंगी बँकेच्या अध्यक्षा कु. पूजा मानमोडे, उपाध्यक्ष श्री तुकाराम चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र बरडे, ए जी एम श्री यादव तसेच अधिकारी श्री प्रदीप गेडाम, श्री सिद्धार्थ भोतमांगे, श्री मकरंद माताडे, श्री पंकज गौळकर, कु भाग्यश्री झाडे व कु सोनल बावणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या योजनेला महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या
Discussion about this post